रायगड : एनसीपीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला आज सुरुवात झाली आहे. दरम्यान, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन एनसीपीने भारतीय जनता पक्ष आणि युती सरकारच्या विरोधातजोरदार आघाडी उघडली आहे. त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी युती सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ते नरेंद्र मोदींवर बोचऱ्या शब्दात टीका केली.
दरम्यान, उद्धव ठाकरेंवर टीका करताना भुजबळ म्हणाले की, ‘युती करायची तर करा, पण त्यासाठी सामान्य लोकांना का फसवता? असा खडा सवाल त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना विचारला. तसेच पुढे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना लक्ष करताना ते म्हणाले की, ‘अमित शाह यांनी पटक देंगे म्हटल्यावर बाळासाहेबांनी अशी लाथ मारली असती, की ते मुंबईत पुन्हा परत आले नसते’.
त्यानंतर मोदींना लक्ष करताना त्यांनी जोरदार टोला हाणत म्हटलं की, ‘यांची डिग्री फेलं, लग्न फेल, घर फेल, चाय फेल, गुजरात मॉडेल फेल, नोटाबंदी फेल, मेक इन इंडिया फेल आणि आता राफेल. उद्योगपती अनिल अंबानी यांनी खेळण्यातले विमान सुद्धा कधी बनवलं नाही आणि त्यांना कंत्राट दिलं, असा जोरदार टोला त्यांनी यावेळी हाणला.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		