5 August 2021 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय | तिथे तर महापालिका आमच्या ताब्यात नाहीत - मुख्यमंत्री Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त
x

चंद्रकांतदादांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात गडकरींच्या कारखाण्याचीही तक्रार | भाजपमध्ये अंतर्गत कलह?

Nitin Gadkari

मुंबई, ०४ जुलै | राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आमदारांसह नेतेमंडळी सभागृहात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी नितीन गडकरी यांच्या कारखान्यावरील कारवाईच्या मागणीवरुन भारतीय जनता पक्षाला टोला लागवला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं ते म्हणाले. तसेच भारतीय जनता पक्षामधील एका गटाकडून गडकरींना लक्ष्य केलं जातंय, असा आरोपही त्यांनी केला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून ज्या साखर कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही दोन कारखान्यांचा समावेश आहे. चंद्रकांत पाटलांच्या पत्रात गडकरींच्या कारखान्यांचा उल्लेख असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

यावर देवेंद्र फडणवीस त्यांना प्रश्न विचारण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी पत्रात मूळ तक्रारीचा उल्लेख करत कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मूळ तक्रार झाली होती तेव्हाच नितीन गडकरी यांनी तीन वेळा लिलाव झाले तरी कोणीच समोर आले नाही असे बंद पडलेले कारखाने लिलावात घेतले असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. सुरु असलेले कारखाने बंद पाडून किंवा कमी किंमतीत घेतलेले नाहीत. तसं जी चौकशी करायची आहे ती करा असंही त्यांनी सांगितलं होतं,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Devendra Fadanvis on Chandrakant Patil Letter regarding Nitin Gadkari Sugar Mill news updates.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x