23 September 2021 6:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

युपी निवडणुक २०२२ | मुस्लिमांनी भारतात राहू नये असे जो म्हणतो तो हिंदू नाही - मोहन भागवत

Uttar Pradesh Assembly Election 2022

गाझियाबाद, ०४ जुलै | देशात इस्लाम धोक्यात आहे या भीतीच्या जाळ्यात फसू नका, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांना केले. ते म्हणाले, ‘हिंदू-मुस्लिम एकतेला वेगळे वळण लावले जात आहे, पण दोन्ही वेगवेगळे नाहीत, तर एकच आहेत. सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे, भलेही ते कोणत्याही धर्माचे असोत. आपण लोकशाहीत राहतो. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे प्रभुत्व राहू शकत नाही, फक्त भारतीयांचे प्रभुत्व असू शकते. मुस्लिमांनी भारतात राहू नये असे जो म्हणतो तो हिंदू असू शकत नाही. भागवत रविवारी मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या ‘हिंदुस्तानी पहले, हिंदुस्तान पहले’ कार्यक्रमाला संबोधित करत होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पुढे मोहन भागवत म्हणाले, ‘पूजा करण्याच्या पद्धतीच्या आधारावर लोकांमध्ये फरक केला जाऊ शकत नाही.’ त्यांनी जमावाद्वारे मारहाण करून हत्येत सहभागी लोकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘असे लोक हिंदुत्वविरोधी आहेत. तथापि, असाही एक काळ होता, जेव्हा काही लोकांविरुद्ध लिंचिंगचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रीयत्व आणि पूर्वजांचा गौरव हा एकतेचा आधार असायला हवा.

हिंदू-मुस्लिम यांच्यातील वादांवर चर्चा हाच एकमेव तोडगा आहे, मतभेद नव्हे.’ कार्यक्रमाच्या सुरुवातीला भागवत म्हणाले की, ‘आम्ही या कार्यक्रमात आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी किंवा व्होट बँकेचे राजकारण करण्यासाठी सहभागी झालेलो नाही. संघ ना कधी राजकारणात होता, ना त्याला आपली प्रतिमा तयार करण्याची चिंता आहे. संघ देशाला मजबूत करण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी काम करत असतो.’

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 Who says that Muslims should not live in India is not a Hindu Mohan Bhagwat news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x