Sarkari Naukri | UPPSC Prelims Exam 2020 | RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली

नवी दिल्ली, २२ सप्टेंबर : UPPSC अर्थात, उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या वतीने घेण्यात आलेल्या RO, ARO या दोन पदांसाठीच्या पूर्व परीक्षांची उत्तर सूची संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 20 सप्टेंबर 2020 ला झालेल्या पुनरावलोकन अधिकारी (Review Officer) आणि सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी ( Assistant Review Officer) या पदांसाठीच्या पूर्व परीक्षांची उत्तर सूची विद्यार्थ्यांना uppsc.up.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील किंवा आक्षेप असतील तर ते देखील नोंदवू शकतात. 13 सप्टेंबर 2020 रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर 20 सप्टेंबरला ही परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा पुढं ढकलण्यासाठी कोणतंही विशिष्ट कारण देण्यात आलं नव्हतं.
परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व पेपर सेटच्या उत्तर सूची या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या सूची डाउनलोड करून विद्यार्थ्यांनी पहाव्यात व ज्या विद्यार्थ्यांना उत्तर सूचींवर आक्षेप आहेत त्यांनी आपले आक्षेप पत्राद्वारे 28 सप्टेंबर पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत UPPSC च्या ऑफिसला पाठवायचे आहेत. यामध्ये उत्तर सूचीच्या प्रिंटआउटबरोबर आवश्यक पुरावे देखील पत्राद्वारे पाठवणे गरजेचे आहे. सामान्य विज्ञान आणि हिंदी विषयाच्या या उत्तर सूची उपलब्ध करून देण्यात आल्या असून 27 सप्टेंबरपर्यंत त्या वेबसाईटवर उपलब्ध असतील.
अशा प्रकारे तपासा उत्तर सूची;
Step 1: uppsc.up.nic.in या UPPSC च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
Step 2: ‘view Key Answer Sheet’ या पर्यावावर क्लिक करा.
Step 3: त्यानंतर तुमच्या प्रश्नपत्रिका संचाची निवड करा. उदा. A /B /C /D
Step 4: त्यानंतर तुमच्या संचाची उत्तर सूची वेबसाईटवर उपलब्ध होईल. भविष्यातील माहितीसाठी तुम्ही त्याची प्रिंट देखील काढून घेऊ शकता.
News English Summary: Uttar Pradesh Public Service Commission (UPPSC) on Monday released the UPPSC RO, ARO prelims exam answer key 2020 on its official website. Candidates who appeared for the exam can download the set-wise answer key from the website uppsc.up.nic.in. The recruitment exam for the posts of review officer and assistant review officer was conducted by UPPSC on 20 September.
News English Title: Uttar Pradesh Public Service Commission prelims exam 2020 Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Sprayking Agro Equipment Share Price | लोकांना करोडपती बनवणाऱ्या कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली, रेकॉर्ड डेट पहा, फायदा घ्या
-
Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?
-
Aditya Vision Share Price | अबब! नशीब बदलणारा शेअर, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 8000 टक्के परतावा दिला, स्टॉक आजही तेजीत
-
Suryalata Spinning Mills Share Price | 25 दिवसात 100% परतावा! हा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक खरेदी करणार का?
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
Adani Group Shares | संकटकाळ पैशाची चणचण तेजीत! अदानी ग्रुपने 34 हजार 900 कोटींचा प्रकल्प बंद केला
-
Gabriel India Share Price | मालामाल शेअर! 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.10 कोटी रुपये परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस पहा
-
Patanjali Foods Share Price | पतंजली फुड्सच्या शेअरला उतरती कळा लागली? सेबीकडून कठोर कारवाई, पुढे स्टॉकचं काय होणार?
-
Udayshivakumar Infra IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! उद्यापासून लाँच होणार, शेअर प्राइस बँड 33 ते 35 रुपये