19 October 2021 8:18 AM
अँप डाउनलोड

Monsoon session | २ दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार | काय असतील महत्वाचे मुद्दे?

Maharashtra Monsoon session 2021

मुंबई, ०४ जुलै | सोमवारपासून सुुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव मांडण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला अाहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यामध्ये वादळी चर्चा होऊन केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात ठराव मंजूर करण्याचा निर्णय झाला. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. परिणामी, नाराज मुख्यमंत्र्यांनी प्रथेप्रमाणे प्रसारमाध्यमांना सामोरे न जाता निघून जाणे पसंत केले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कोरोनामुळे विरोधकांसाठी चहापान नव्हते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रीतसर पत्रकार परिषद घेतली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ बैठकीनंतर सत्ताधारी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधतात. रविवारी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्षांची प्रथा खंडित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे.

दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इतर मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर याच अधिवेशनात सत्ताधारी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra legislature Assembly Monsoon session 2021 Live news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x