6 May 2024 10:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

CBI प्रमुख आलोक वर्मा यांची पुन्हा उचलबांगडी; पंतप्रधानांचा २-१ मतांनी तडकाफडकी निर्णय

नवी दिल्ली : CBI चे संचालक आलोक वर्मा यांना सीबीआयच्या प्रमुख पदावरून हटविल्याच्या निर्णयाला स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा रुजू होण्यास सांगितले होते. दरम्यान, त्यांनी बुधवारी कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पदभार सुद्धा स्वीकारला होता. परंतु, आज त्यांची तडकाफडकी गच्छंती करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मोदींनी यांनी आज सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी नियुक्ती समितीची बैठक बोलावली होती. या समितीमध्ये एकूण ३ सदस्य असतात. यामध्ये सीक्री आणि काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे हे देखिल यावेळी उपस्थित होते. यामध्ये खरगे यांनी वर्मा यांच्या गच्छंतीला तीव्र विरोध केला असल्याचे वृत्त आहे. परंतु, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये २-१ मतांनी आलोक वर्मा यांच्या उचलबांगडीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. वर्मा यांना कनिष्ठ दर्जाच्या होमगार्ड, नागरी सुरक्षा आणि अग्निशमन सेवा यावर महासंचालक बनविण्यात आले आहे.

आजच सायंकाळी आलोक वर्मा यांनी CBIच्या ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुन्हा त्यांच्या जुन्या पदावर बदली केली होती. त्यात सह-संचालक अजय भटनागर, डीआयजी एम के सिन्हा, तरुण गौबा, मुरमगेसन आणि अतिरिक्त संचालक ए. के. शर्मा यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, CBIचे विशेष अधिकारी राकेश अस्थाना आणि DSP देवेंद्र कुमार यांच्याविरोधातील आरोपांवर दिल्ली हायकोर्टात उद्या सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x