8 May 2025 7:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Small Cap Fund | पगारदारांनो, बँक FD ने शक्य नाही, या फंडात 5 ते 6 पटीने बचत वाढेल, असे फंड निवडा Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
x

तेलंगणातील राज्यस्तरीय शेतकरी 'रयत बंधू योजनेचा' केंद्राकडून राष्ट्रीय स्तरावर विचार होणार?

हैदराबाद: मागील काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हिंदी पट्ट्यातील ३ महत्वाची राज्य गमवावी लागली होती. दरम्यान, या ३ प्रमुख राज्यांमध्ये भाजपला शेतकऱ्यांच्या नाराजीचा सर्वात मोठा फटका बसल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु, असे असले तरी तेलंगणात मात्र काँग्रेस, टीडीपी आणि भाजप असे मोठे प्रतिस्पर्धी समोर असताना सुद्धा टीआरएस’ला अभूतपूर्व यश प्राप्त झालं होतं.

टीआरएसच्या यशामागील मूळ कारण होतं ते ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून मिळालेला प्रतिसाद हे समोर आलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्लीत देशभरातील शेतकऱ्यांनी भव्य आंदोलन केलं होतं. परंतु, त्यामध्ये तेलंगणाच्या शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता. कारण तेलंगणातील केसीआर सरकारनं ‘रयत बंधू’ योजना राबवल्यानं शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला होता. याच योजनेच्या यशामुळे टीएसएस’ने तेलंगणातील मोठा विजय प्राप्त केला होता. परंतु, दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशातील असलेली सत्ता सुद्धा गमवावी लागली. त्याला मूळ कारण होतं ते ग्रामीण भागात पडलेला फटका आणि शेतकऱ्यांचा रोष हीच कारण होती.

आता मोदी सरकार तेलंगणाच्या पॅटर्न अमलात आणण्याचा विचार करत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना एकरामागे काही विशिष्ट रक्कम देण्याचा विचार केंद्राकडून केला जात आहे. नोटाबंदी, जीएसटी, दुष्काळामुळे बळीराजा सध्या मोठ्या अडचणीत आहे. त्यामुळे बळीराजाला विश्वास देऊन खुश करण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीआधी केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेची प्रेरणा मोदी सरकारला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून मिळाली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या