19 May 2024 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Motor Floater Insurance Policy | एकाच विमा पॉलिसीमध्ये एकापेक्षा जास्त वाहने कव्हर होतील | तेही कमी प्रीमियममध्ये

Motor Floater Insurance Policy

Motor Floater Insurance Policy | तुमच्याकडे एकापेक्षा जास्त गाड्या असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमच्या प्रत्येक कारसाठी स्वतंत्र मोटार विमा पॉलिसी घेण्याची गरज भासणार नाही. एकच विमा पॉलिसी घेऊन तुम्ही तुमच्या सर्व वाहनांना विमा संरक्षण देऊ शकाल. मोटर फ्लोटर इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे.

आयआरडीएआय’ची परवानगी :
इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांना मोटार फ्लोटर विमा पॉलिसी सुरू करण्याची परवानगी दिली आहे. ‘इर्डा’ने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

मोटर फ्लोटर पॉलिसीने सर्व वाहनांना विमा संरक्षण :
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार मोटर फ्लोटर पॉलिसीही मेडिक्लेमच्या फ्लोटर पॉलिसीसारखीच आहे. मेडिकल फ्लोटर पॉलिसीमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना एकाच पॉलिसीमध्ये आरोग्य विम्याचे संरक्षण मिळते. त्याचप्रमाणे मोटार फ्लोटर पॉलिसीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या सर्व वाहनांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. फ्लोटर पॉलिसी सुरू झाल्याने विम्यावरील एकूण खर्च कमी होईल, कारण जास्त वाहनांचा विमा काढल्यास कंपन्या कमी प्रीमियम घेतील, असे विमा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

फ्लोटर पॉलिसीतील प्रीमियम स्वस्त :
आम्ही मेडिक्लेम पॉलिसीच्या फायद्यांवरून मोटर फ्लोटर पॉलिसी समजू शकतो. कुटुंबातील सदस्यांसाठी वैयक्तिक आरोग्य विमा घेण्यासाठी अधिक खर्च येतो. त्याचबरोबर कुटुंबाने फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी घेतली तर त्यासाठी कमी पैसे खर्च करावे लागतात. आता वाहन विम्याच्या बाबतीतही असेच होणे अपेक्षित आहे. ‘आयआरडीएआय’ची अधिसूचना जारी झाल्यानंतर विमा कंपन्या आता मोटर फ्लोटर पॉलिसीच्या अटी व शर्ती बनवतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या फ्लोटर पॉलिसीतील प्रीमियम स्वस्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे वाहन मालकांमध्ये ते चांगलेच लोकप्रिय होईल.

वाहने एकाच व्यक्तीच्या नावे नोंदणीकृत असणे आवश्यक :
मोटार फ्लोटर पॉलिसी खरेदी करण्याची अट अशी आहे की सर्व वाहने एकाच व्यक्तीच्या नावे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. एका जनरल इन्शुरन्स कंपनीच्या एक्झिक्युटिव्हने सांगितले की, एका पॉलिसीअंतर्गत 5 वाहनांचा विमा उतरवता येतो. यामुळे वाहनमालकाला वेगवेगळ्या वाहनांच्या विम्याच्या वेगवेगळ्या एक्स्पायरी डेट्स आणि वेगवेगळे प्रीमियम लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. फ्लोटर पॉलिसी टू व्हीलर आणि फोर व्हीलर या दोन्ही वाहनांसाठी घेता येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Motor Floater Insurance Policy with low premium amount check details 08 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x