19 May 2024 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
x

Nothing Phone 1 | नथिंग फोन 1 लाँच होतोय | 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि बरंच काही मिळणार

Nothing Phone 1

Nothing Phone 1 | नथिंग फोन १ आज जागतिक स्तरावर लाँच होणार आहे. जगभरातील युजर्स कंपनीच्या या पहिल्या हँडसेटची आतुरतेने वाट पाहत होते. कंपनीतर्फे रिटर्न टू इन्स्टिक्शन या ग्लोबल इव्हेंटमध्ये हा फोन लाँच केला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर या इव्हेंटचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला पाहता येणार आहे. याशिवाय तुम्हाला हवं असल्यास खालील व्हिडिओ लिंकवर क्लिक करून हा इव्हेंट लाईव्ह पाहू शकता.

स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या :
हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ जी+ प्रोसेसरसह येणार असल्याची पुष्टी कंपनीने आधीच केली आहे. लीक झालेल्या वृत्तानुसार, नथिंग फोन 1 मध्ये कंपनी फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देणार आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये तुम्हाला 6.55 इंचाची ओएलईडी स्क्रीन पाहता येईल, जी 120 हर्ट्जच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

प्रोटेक्शनसाठी यात गोरिला ग्लास :
फोनच्या फ्रंट आणि बॅक पॅनलच्या प्रोटेक्शनसाठी यात गोरिला ग्लास दिला जाऊ शकतो. हा फोन अँड्रॉयड १२ आऊट ऑफ द बॉक्सवर काम करेल, असे सांगण्यात येत आहे. नथिंग फोन 1 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात देण्यात आलेली एलईडी नोटिफिकेशन सिस्टम, जी कंपनीच्या ग्लिफ इंटरफेसद्वारे सपोर्टेड आहे.

एलईडी लाइट नोटिफिकेशन :
रियरमध्ये देण्यात आलेला हा एलईडी लाइट नोटिफिकेशन आल्यावर चालू केला जाईल. युजर डेडिकेटेड कॉन्टॅक्ट्सनुसार या एलईडी लाइटिंगचा अलर्ट पॅटर्नही सेट केला जाणार आहे. यासोबतच फोनच्या चार्जिंगदरम्यान बॅटरीच्या टक्केवारीची माहितीही दिली जाणार आहे. हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येणार असल्याची पुष्टीही कंपनीने टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.

इतकी असू शकते किंमत :
नथिंग फोन 1 भारतात 30 ते 40 हजार रुपयांदरम्यान लाँच केला जाऊ शकतो. अॅमेझॉन जर्मन वेबसाइटवरही हा फोन पाहिल्याची माहिती आहे. लिस्टिंगनुसार, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनच्या व्हेरियंटची किंमत सुमारे ३७,९०० रुपये असेल. त्याच वेळी, फोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे ४४,३०० रुपये सह येते. हा फोन ८ जीबी रॅम + २५६ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटसह देखील येऊ शकतो आणि त्याची किंमत सुमारे ४०,३०० रुपये असू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Nothing Phone 1 will launch soon check details 12 July 2022.

हॅशटॅग्स

#Nothing Phone 1(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x