बंगळुरू : कर्नाटकामधील कारवारजवळ समुद्रात बोट उलटल्याने झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये एकूण चोवीस प्रवासी स्वार होते. दरम्यान, हे सर्व प्रवासी बोटीने देवदर्शनाला निघाले असता हा अपघात झाल्याचे वृत्त आहे.

आज पहाटे सकाळी ही दुर्घटना घडल्याचे समजते. त्यानंतर हे वृत्त समजताच स्थानिक मच्छिमार आणि कोस्टगार्डच्या जवानांनी ६ जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले होते. परंतु, बोटीतील अन्य प्रवासी बेपत्ता असून, बचाव आणि मदत युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान, सदर मदत आणि बचाव कार्यासाठी भारतीय नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टर आणि पाणबुड्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.

six dead after boat capsized near karwar