2 May 2024 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Investment Planning | LIC घेऊन आली आहे धन रेखा विमा पॉलिसी, जाणून घेऊ या योजनेचे जबरदस्त फायदे

LIC dhan Rekha policy

Investment Planning | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC इन्शुरन्स क्षेत्रात काम करणारी भारतातील एक अग्रणी कंपनी आहे. ही देशातील सर्व विमा कंपन्यांपैकी सर्वात मोठी कंपनी आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. LIC कंपनीचे संचालन आणि व्यवस्थापन सरकारे द्वारे केले जाते आणि वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी कंपनी चांगल्या योजना जाहीर असते.

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC वेळोवेळी ग्राहकांसाठी उत्तम गुंतवणूक करण्याचा संधी आणि सुरक्षित विमा योजना आणत असते. LIC ही देशातील सर्वोत्तम विमा कंपन्यांपैकी एक आहे. ज्यामध्ये कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करता येते, म्हणजेच येथे केलेली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते कारण त्यावर सरकारचे नियंत्रण असते. वास्तविक ह्या कंपनीचे संचालन आणि व्यवस्थापन सरकार द्वारे केले जाते. आता LIC ने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त योजना आणली आहे. या योजनेबद्दल जाणून घेऊया.

LIC धनरेखा पॉलिसी :
एलआयसीने सांगितले की, या विमा पॉलिसीचे नाव ‘धनरेखा योजना’ आहे. यामध्ये योजनेमध्ये, तुमची पॉलिसी चालू स्थितीत असल्यास, विमा रकमेचा एक ठराविक भाग नियमित अंतराने सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणून तुम्हाला दिला जाईल. हा तुमचा परतावा असेल. म्हणजेच ही योजना तुम्हाला मोठे फायदे देणार आहे.

पॉलिसीसाठी पात्रता काय आहे?
LIC च्या योजनेनुसार या पॉलिसीचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारकाला आधीच मिळालेली रक्कम वजा न करता संपूर्ण विमा रक्कम दिली जाईल. या योजनेत किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम गुंतविली जाऊ शकते. त्यात गुंतवणुकीसाठी दिलेल्या अटींनुसार योजनाधारकचे वय जर 90 दिवसांपासून ते आठ वर्षापर्यंत असेल तर त्या बालकांच्या नावावर या योजनेअंतर्गत पैसे जमा करता येते. त्याचप्रमाणे, योजनाधरकाची कमाल वयोमर्यादा 35 वर्षे ते 55 वर्षे आहे. धनरेखा योजना मध्ये 3 प्रकार आहेत. त्यांना टर्म मध्ये विभागलेले आहे, तुम्ही ह्या योजना तीन मध्ये सुरू करू शकता.

कंपनीने ही योजना 3 वेगवेगळ्या अटींसह आणली आहे :
यामध्ये 20 वर्षे, 30 वर्षे आणि 40 वर्षे या तीन टर्म आहेत. त्यातून तुम्ही कोणतीही एक योजना निवडू शकता. तुम्हाला मुदतीनुसार प्रीमियम रक्कम भरावी लागेल. जर तुम्ही 20 वर्षांच्या मुदतीची निवड केली तर तुम्हाला 10 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही 30 वर्षांची मुदत निवडल्यास, तुम्हाला 15 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. तुम्ही 40 वर्षांची मुदत निवडल्यास, तुम्हाला 20 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. याशिवाय, तुम्ही सिंगल प्रीमियम देखील भरू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: LIC new policy for investment as on 19 July 2022

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x