Pre-Approved Personal Loan | फक्त OTP प्रोसेसवर मिळतोय झटपट पर्सनल लोन, पैसे सुद्धा लवकर खात्यात येतील

Pre-Approved Personal Loan | सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक आपल्या खातेदारांना प्री-अप्रूव्हड पर्सनल लोन देत आहे. आपत्कालीन परिस्थितीत अचानक पैशांची गरज भासली तर खातेदारांना बँकेच्या पीएनबी वन अॅपद्वारे ४ क्लिकद्वारे आणि सिंगल ओटीपीद्वारे झटपट कर्ज घेता येईल. बँक खातेदारांना त्वरित कर्जसुविधा देत आहे. पंजाब नॅशनल बँकेने याबाबत ट्विट केले आहे.

एकाच ओटीपीमध्ये त्वरित कर्ज मिळवा:
पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले की, “आपत्कालीन निधीची गरज भासू लागली? प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोनवर विश्वास ठेवा! पीएनबी वन मोबाइल अॅपच्या माध्यमातून एकाच ओटीपीने निधी मिळवा. इंट्रेस्टेड? http://instaloans.pnbindia.in जा किंवा अर्ज करण्यासाठी 18001802222 कॉल करा.

पर्सनल लोन :
पर्सनल लोनचा वापर सामान्यत: खर्च भागविण्यासाठी शिक्षण, वैद्यकीय उपचार, विवाह, प्रवास इत्यादी विविध वैयक्तिक गरजांसाठी केला जाऊ शकतो. ही असुरक्षित कर्जे आहेत आणि त्यांना कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही. त्यामुळे हे लेंडर्ससाठी जोखमीचे असून, त्याचा व्याजदर अधिक आहे.

ओटीपी भरा, खात्यात पैसे मिळवा :
पीएनबीच्या प्री-अप्रूव्हेटेड पर्सनल लोनसाठी खातेदारांना फक्त एकच ओटीपी टाकून त्यासोबत आपला काही आवश्यक तपशील द्यावा लागतो. यानंतर तुमचा कर्जासाठीचा अर्ज पूर्ण होईल. पूर्वमंजुरीत कर्जासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. या कर्जासाठी कोणतेही कागदी काम करण्याची गरज नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Pre Approved Personal Loan using OTP check details 21 July 2022.