 
						e-Pan Download | पर्मनंट अकाउंट नंबर किंवा पॅनकार्ड हा आज अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. हल्ली सरकारी ते खासगी कामे करण्यासाठी पॅनकार्ड सक्तीचे झाले आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते क्रेडिट कार्ड- डेबिट कार्ड बनवण्यापर्यंत किंवा आयटीआर फाइल करण्यापर्यंत सगळीकडे पॅनकार्ड बंधनकारक आहे.
पॅन कार्ड हरवलं असेल तर :
अशा परिस्थितीत जर तुम्हाला आयटीआर रिटर्न भरायचा असेल पण पॅन कार्ड हरवलं असेल तर ते तुम्हाला काही मिनिटांत मिळू शकतं. होय होय।। इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड किंवा ई पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता. चला जाणून घेऊया की आज अनेक वित्तीय संस्था केवळ ई-पॅन कार्ड स्वीकारतात. हे खूप सोयीस्कर आहे.
पीआयबी ने ट्वीट केले :
आज इन्कम टॅक्स डे निमित्त पीआयबी हिंदीकडून एक ट्विट करण्यात आलं आहे. त्यात म्हटले आहे की, करदात्यांच्या सुविधांच्या दिशेने एक नवीन पाऊल आहे. तुमचा पॅन ताबडतोब मिळवा. वाट बघण्याची वेळ नाही.. ‘इन्स्टंट’ डाउनलोड करा. आता आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवरून काही मिनिटांत ई-पॅन मिळवता येणार आहे.
ई-पॅन डाउनलोड कसे करावे :
* ई-पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम इन्कम टॅक्स https://www.incometax.gov.in/iec/foportal ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक करा.
* त्यानंतर इन्स्टंट ई-पॅन पर्याय निवडा.
* त्यानंतर नवीन ई-पॅन पर्याय निवडा. येथे तुम्हाला पॅन कार्ड नंबर विचारला जाईल. तुमचा पॅन कार्ड नंबर टाका.
* पॅन कार्ड नंबर आठवत नसेल तर तुम्ही तुमचा आधार क्रमांकही टाकू शकता.
* त्यानंतर तुम्हाला विविध प्रकारच्या अटी आणि शर्ती दिल्या जातील. ते वाचा आणि नंतर स्वीकार पर्यायावर क्लिक करा.
* यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. हा ओटीपी प्रविष्ट करा.
* यानंतर, सर्व तपशील तपासा आणि नंतर सबमिट बटण दाबा. यानंतर तुम्हाला पॅनची पीडीएफ तुमच्या प्रविष्ट ईमेल आयडीवर (ई-मेल आयडी) पाठवली जाईल.
* ही पीडीएफ डाऊनलोड करा. त्यानंतर हा ई-पॅन डाऊनलोड करा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		