 
						5G Spectrum Auction | दूरसंचार विभाग मंगळवारी 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. याअंतर्गत २० वर्षांसाठी एकूण ७२,०९७.८५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम, भारती एअरटेल, अदानी डेटा नेटवर्क्स आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना अखेर लिलावात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी रिलायन्स जिओने १४ हजार कोटी, अदानी समूहाने १०० कोटी, भारती एअरटेलने ५५०० कोटी रुपये, तर व्होडाफोन आयडियाने २२०० कोटी रुपयांची हेरिटेज रक्कम जमा केली आहे.
भारत सरकारकडून आज 5 जी स्पेक्ट्रमचा (5G लिलाव) लिलाव होणार आहे. 5 जीच्या या लढाईत मुकेश अंबानी यांची जिओ आणि सुनील मित्तल यांची एअरटेल ही थेट स्पर्धा मानली जातेय. पण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांची कंपनी अदानी डेटा नेटवर्क लिमिटेडच्या प्रवेशामुळे 5 जी लढाई अधिक रंजक झाली आहे.
या लिलावात कुमारमंगलम बिर्ला यांची व्होडाफोन आयडिया (VI) ही कंपनीही सहभागी आहे. अदानी समूहाने या लिलावात प्रवेश केल्याने गौतम अदानी यांची नजर आता दूरसंचार क्षेत्रावरही आहे का, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. चला जाणून घेऊयात या लिलावाबाबत कंपनी काय म्हणतेय.
सरकार आकारणार फक्त एक रकमी स्पेक्ट्रम शुल्क :
उर्वरित हप्त्यांच्या संदर्भात भविष्यातील थकबाकीशिवाय १० वर्षांनंतर स्पेक्ट्रम सरेंडर करण्याचा पर्याय निविदाकारांना देण्यात येणार आहे. सप्टेंबर 2021 च्या टेलिकॉम रिलीफ पॅकेजनुसार सरकार फक्त एक वेळचे स्पेक्ट्रम चार्जेस आकारणार आहे. स्पेक्ट्रम वापराचे शुल्क माफ करण्यात आले आहे. स्पेक्ट्रमसाठी २० समान वार्षिक हप्त्यांमध्ये पैसे दिले जाऊ शकतात.
काय आहे अदानी समूहाची योजना :
5 जी लिलावात उतरण्यामागे अदानी समूहाने म्हटले आहे की, कंपनीला आपल्या विमानतळ आणि बंदरांसाठी खासगी नेटवर्कची गरज आहे. त्यामुळेच कंपनी या लिलावात सहभागी होत आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की ग्राहक मोबाइल स्पेसमध्ये प्रवेश करण्याची सध्या कोणतीही योजना नाही. पण असं असलं तरी अंबानींनी ज्या क्षेत्रात आधीच पाय रोवले आहेत, त्या क्षेत्रात अदानी गुंतवणूक करत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. 6 वर्षांपूर्वी अंबानी टेलिकॉम क्षेत्रात उतरले होते. ज्यानंतर रिलायन्स जिओच्या माध्यमातून त्यांनी या संपूर्ण क्षेत्राचं चित्रच बदलून टाकलं.
5 जी लिलावांकडेही अत्यंत गांभीर्याने पाहिलं जात आहे :
डिजिटल विकासाच्या दृष्टीने भारताने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जिथे अॅमेझॉन आणि वॉलमार्ट सारख्या कंपन्या ई-कॉमर्सच्या जगात प्रवेश करत आहेत. यामुळे 5 जी लिलावांकडेही अत्यंत गांभीर्याने पाहिलं जात आहे. मात्र, या सर्वांमध्ये अदानी डेटाने जमा केलेल्या डिपॉझीट मनीचीही खूप चर्चा होत आहे. रिलायन्सने १४ हजार कोटी रुपये जमा केले असताना अदानी समूहाच्या कंपनीने लिलावासाठी केवळ १०० कोटी रुपयेच जमा केले आहेत.
बेक्सले अॅडव्हायझर्स’चे तज्ज्ञ म्हणतात, ”५ जी’च्या रोलआऊटचा भारताला खूप फायदा होईल. उत्कर्ष म्हणतो, “अदानींच्या एन्ट्रीने रिलायन्स जिओला धक्का बसला आहे. मोठ्या प्रमाणावर जमा होणारे पैसे पाहता असे वाटते की, कोणत्याही परिस्थितीत ते गमावायचे नाही.
या शहरांमध्ये प्रथम :
दिल्ली, गुरुग्राम, लखनऊ, चंदीगड, अहमदाबाद, गांधीनगर, जामनगर, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या शहरांची सुरुवात सर्वात आधी होण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		