
Multibagger Stocks | रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स कंपनीने अलीकडेच त्यांच्या गुंतवणूकदारांना 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. कंपनीने आता आपल्या गुंतवणूकदारांना प्रती शेअर 1400 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. बोनस शेअर जाहीर केल्यानंतर आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त लाभांश देण्यासाठी सज्ज झाली आहे.
50,000 टक्क्यांहून अधिक परतावा :
ह्या कंपनीचे नाव आहे रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स. ह्या मल्टीबॅगर कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 50,000 टक्क्यांहून अधिक असा प्रचंड मोठा परतावा मिळवून दिला आहे. काही वर्षांपूर्वी ह्या कंपनीचे शेअर्स 3 रुपयांवर ट्रेड करत होते, पण आता ह्या शेअरची किंमत 1600 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्सने अलीकडेच त्यांच्या गुंतवणूकदारांना 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. आणि आता कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1400 टक्के लाभांश देणार आहे.
एक लाखाचे झाले पाच कोटी :
रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्सच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. 23 जुलै 2004 रोजी रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्सचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 2.96 रुपयांचना ट्रेड करत होते. 25 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स दिवसा अखेर 1612 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 50000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्सच्या शेअर्समध्ये 18 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक आजपर्यंत होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.4 कोटी रुपये झाले असते.
प्रती शेअर 1400 टक्के लाभांश :
रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1400 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 1400 रुपये लाभांश मिळेल. लाभांशाची नोंदणी दिनांक 1 ऑगस्ट 2022 असेल. कंपनीने या पूर्वीही आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते, त्याची एक्स-डेट 30 जून 2022 होती. रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्सच्या शेअर्सनी मागील ५ वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना १९५% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. 28 जुलै 2017 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 545.70 रुपयांना ट्रेड करत होते. 25 जुलै 2022 रोजी दिवसा अखेर कंपनीचे शेअर्स 1612 रुपयांवर बंद झाले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.