
Multibagger Stocks | शेअर बाजारात गुंतवणूकदारांना नफा आणि तोटा होतच असतो. बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. असेच काही रासायन क्षेत्राशी संबंधित शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे.
ठळक मुद्दे :
1) अतुल लिमिटेडच्या स्टॉकने बंपर परतावा दिला
2) हा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत आला
3) प्रती शेअर दहा रुपये गुंतवणुकीचे झाले दहा हजार
गुंतवणूकदारांना करोडपती केले :
शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखमीचे आहे, कारण कधी पैसे बुडतील ह्याचा नेम नाही. मात्र, असे बरेच लोक आहेत जे हा धोका पत्करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्याचबरोबर शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. कधी कधी शेअर बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त परतावाही मिळून जातो. त्यामुळे लोक शेअर बाजाराकडे अधिक आकर्षित होतात, आणि गुंतवणूक करतात. मात्र, शेअर बाजारातही तोटा होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, मार्केटमध्ये असे स्टॉक देखील आहे ज्यानी लोकांना दीर्घ कालावधीत चांगला नफा मिळवून दिला आहे.
मल्टीबॅगर कंपनी अतुल लिमिटेड :
अशीच एक मल्टीबॅगर कंपनी आहे अतुल लिमिटेड. ह्या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे. 22 वर्षांच्या आत, कंपनीने गुंतवणूकदारांना इतका प्रचंड परतावा मिळवून दिला आहे की गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. अतुल लिमिटेड ही रासायन क्षेत्राशी संबंधित व्यापार करणारी कंपनी आहे. 1 जानेवारी 1999 रोजी अतुल लिमिटेड कंपनीचा शेअर 22 रुपयेवर ट्रेड करत होता. आता 22 जुलै 2022 रोजी, एनएसई वर हा स्टॉक दिवसाअखेर 8,644.50 रुपये वर बंद झाला होता.
प्रती शेअर 10 रुपयांचे झाले 10 हजार :
5 मे 2000 रोजी अतुल लिमिटेडचा शेअर 10.35 रुपयेवर ट्रेड करत होता. अशा परिस्थितीत या स्टॉकने 2021 आणि 2022 मध्ये प्रती शेअर 10 हजारांचा टप्पाही ओलांडला आहे. सध्या या शेअरचा 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 10969 रुपये होती आणि 52 आठवड्यांची नीचांक किंमत 7750 रुपये आहे. ह्या स्टॉकने अवघ्या 22 वर्षाच्या काळात 10 रुपयांवरून 10,000 रुपयांपर्यंत वाढ दर्शवली आहे.
करोडो रुपयांचा परतावा :
जर तुम्ही अतुल लिमिटेड कंपनीचे 1000 शेअर्स 2000 साली 10 रुपयांना खरेदी केले असते, तर त्या वेळी तुम्हाला फक्त 10 हजार रुपये गुंतवावे लागले असते. तर आज तुमक्या दहा हजारात घेतलेल्या 1000 शेअर्सचा तुम्हाला 1 कोटी 9 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. दुसरीकडे, जर तुमचे 1000 शेअर्स प्रती शेअर 8600 रुपये ला विकले गेले असते, तर तुम्हाला 86 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.