28 April 2024 1:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Investment Planning | तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित करणारी योजना, दररोज 150 रुपये गुंतवा आणि चिंतामुक्त व्हा

investment plan, LIC,

Investment Planning | सर्व पालक आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित व्हावे म्हणून थोडी फक्त गुंतवणूक करून ठेवतात. जेणेकरून मुलांना भविष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये. त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे अशी काळजी पालक घेत असता. तुम्हीही तुमच्या पाल्याचे भविष्य सुरक्षित व्हावे म्हणून आतापासूनच गुंतवणूक करू शकता. जर तुमचे मूल 3 महिने ते 12 महिने च्या दरम्यान असेल, तर तुम्ही त्याच्या भविष्यासाठी आतापासून LIC च्या प्रीमियम योजनेत गुंतवणूक करू शकता.

LIC जीवन तरुण पॉलिसीमध्ये गुंतवणूक :
मुलांच्या जन्मापासूनच पालकांना मुलांच्या भविष्याची, शिक्षणाची, आरोग्याची, इतर सर्व काळजी वाटू लागते. आपले मूल मोठे होईपर्यंत आपल्याकडे एक चांगला निधी तयार असावा असे सर्व पालकांना वाटत असते, तुम्हालाही असेच वाटत असेल तर, त्यासाठी तुम्ही आतापासूनच LIC जीवन तरुण पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता. विमा योजनांसाठी LIC ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह कंपनी मानली जाते. त्यात तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते. तसेच, एलआयसीच्या धोरणांमुळे तुम्हाला आणखी चांगला परतावा मिळण्यास मदत होते.

एलआयसीची जीवन तरुण पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड मर्यादित प्रीमियम योजना आहे हे. मुलांचे भविष्य आणि शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन ही योजना खास तयार करण्यात आली आहे. याशिवाय, मुलांना बचत आणि विमा संरक्षण या दोन्हीं सुविधेचा लाभ या योजनेत मिळतो.

गुंतवणूक वयोमर्यादा :
एलआयसी जीवन तरुण पॉलिसी चे लाभ घेण्यासाठी तुमचे मूल तीन महिने ते 12 वर्षांच्या दरम्यान असावे, तरच तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता. किमान वयोमर्यादा तीन महिने आहे तर कमाल वयोमर्यादा बारा महिने आहे.

पॉलिसीमध्ये उपलब्ध पर्याय :
जीवन तरुण पॉलिसी एक अतिशय लवचिक अशी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही सर्व्हायव्हल बेनिफिटचा पर्याय निवडू शकता. जर विमाधारकाने पहिला पर्याय निवडला, तर त्याला कोणत्याही प्रकारचे जीवित लाभ मिळत नाही. तसेच 100% विम्याची रक्कम करमुक्त आहे.

मॅच्युरिटी कालावधी :
जर आपण ह्या योजनेत गुंतवणूक करत असाल तर, तुमचे मूल २५ वर्षांचे झाल्यावर, तुमची LIC जीवन तरुण पॉलिसी परिपक्व होईल. जर तुम्ही 10 वर्षांच्या मुलासाठी पॉलिसी घेतली असेल, तर ती पुढील 15 वर्षांनी मॅच्युअर होईल. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार यामध्ये गुंतवणूक करू शकता. तुमचे मूल २० वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल. ज्यानंतर 5 वर्षांनी म्हणजेच मूल 25 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला मॅच्युरिटीची पूर्ण रक्कम परतव्यासह परत मिळेल.

रोज 150 रुपये गुंतवून किती परतावा मिळेल :
जर तुमच्या मुलाचे वय 12 वर्षे असेल आणि तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर पॉलिसीची मुदत किमान 5 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 13 वर्षांसाठी असेल. जर तुम्ही दररोज 150 रुपये गुंतवले तर तुमची एकूण गुंतवणूक वार्षिक 55 हजार रुपये जमा होईल. या अर्थाने पुढील आठ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 4 लाख 40 हजार 665 रुपये होईल. ज्यावर तुम्हाला 2 लाख 47 हजार रुपयांचा परतावा मिळेल. तसेच त्यावरील विमा रक्कम 5 लाख रुपये असेल. याशिवाय, तुम्हाला 97 हजार 500 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट सुध्दा मिळेल, जो तुमचे मूल 25 वर्षांचे झाल्यावर एकूण 8 लाख 44 हजार 500 रुपयांचा लाभ देईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Investment planning of LIC Jeevan Tarun Policy benefits on 28 July 2022.

हॅशटॅग्स

#Investment Planning(50)#LIC(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x