2 May 2024 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
x

Royal Enfield Hunter 350 | रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त बाईक लाँच होतेय, लाँचपूर्वी अनेक खास गोष्टी उघड झाल्या

Royal Enfield Hunter 350

Royal Enfield Hunter 350 | रॉयल एनफील्डने आपली आगामी बाईक रॉयल एनफील्ड हंटर 350 चा टीझर रिलीज केला आहे. बऱ्याच दिवसांपासून या बाईकबद्दल बाजारात बरीच चर्चा सुरू असून लाँचिंगपूर्वी त्यासाठी बरीच चर्चा रंगली असून आता कंपनी या बाईकच्या लाँचिंगसाठी सज्ज झाली आहे.

कधी होणार लाँच :
खरेदीदारांची प्रतीक्षा संपणार असून ७ ऑगस्ट रोजी रॉयल एनफिल्ड हंटर ३५० लाँच होणार आहे. ३५० सीसी सेगमेंटमध्ये आधीच रॉयल एनफिल्डचे वर्चस्व आहे. रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ही भारतातील सर्वात लोकप्रिय 350 सीसी बाईक आहे.

बुलेट 350 देखील लॉन्च केली जाऊ शकते :
कंपनीने हा टीझर ट्विस्टसह रिलीज केला आहे. या टीझरमध्ये ‘बुलेट मेरी जान’ हे घोषवाक्यही देण्यात आले असून ही तारीख ७ ऑगस्ट 2022 रोजी दिसत आहे. या तारखेला कंपनी नवीन बुलेट सादर करू शकते अशी शक्यता आहे.

बरीच माहितीही लीक :
याआधी रॉयल एनफिल्ड हंटर 350 बद्दल बरीच माहितीही लीकच्या माध्यमातून समोर आली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या बाईकमध्ये 349 सीसीचं इंजिन वापरता येणार आहे. बाइकचे सिंगल सिलिंडर इंजिन २० बीएचपीपर्यंत पॉवर जनरेट करू शकते.

खास गोष्ट म्हणजे :
रॉयल एनफिल्ड मेटिओरमध्ये वापरण्यात येणारी ही मोटार असून खास गोष्ट म्हणजे हंटर ही कंपनीची सर्वात स्वस्त आणि सर्वात लहान बाइक असणार आहे. त्याची लांबी २०५५ मिमी तर रुंदी ८०० मिमी आहे. बाइकचा व्हीलबेस १३७० मिमी असून त्याचे वजन ३६० किलो आहे. बाईकची किंमत जवळपास दीड लाख रुपये असू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Royal Enfield Hunter 350 will be launch soon check details 31  July 2022.

हॅशटॅग्स

#Royal Enfield Hunter 350(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x