27 April 2024 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
x

IDBI Mutual Fund | 5 वर्षात गुंतवणूकदार झाले करोडपती, तुम्ही या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुकीचा विचार करा

IDBI mutual fund

IDBI Mutual Fund | या म्युचुअल फंड योजनेत ज्या गुंतवणूकदारांनी पैसे लावले, त्यांना दुप्पट पैसे मिळाले आहेत. यामध्ये खास गोष्ट अशी आहे की तुम्ही कमीतकमी 500 रुपये मासिक SIP ने गुंतवणूक सुरू करू शकता.

IDBI म्युच्युअल फंड:
देशात अनेक मोठ्या बँक म्युच्युअल फंड योजना राबवत असतात. त्याचप्रमाणे आयडीबीआय बँकही म्युचुअल फंड व्यवसाय करते. IDBI म्युच्युअल फंड ही आयडीबीआय बँकेची उपकंपनी आहे. IDBI म्युच्युअल फंड द्वारे अनेक गुंतवणूक योजना राबवल्या जात आहेत, ज्यांचे एक्सपोजर इक्विटी व्यतिरिक्त कर्जात पुरवठा आणि गुंतवणूक असे आहे. आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. अशा 3 योजनांची चर्चा आज आपण ह्या लेखात करणार आहोत.

आयडीबीआय निफ्टी इंडेक्स फंड :
आयडीबीआय निफ्टी इंडेक्स फंडाने मागील पाच वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 16.45 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. यामध्ये ज्यांनी 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, आज त्यांची गुंतवणूक 2.14 लाख रुपये झाली आहे. त्याच वेळी, 10,000 रुपयांच्या मासिक SIP चे मूल्य 10.04 लाख रुपये झाले आहे. या योजनेत, किमान गुंतवणूक एकरकमी 5,000 रुपये गुंतवणूक केली जाऊ शकते, तर किमान 500 रुपयांची SIP ने गुंतवणूक सुरू केली जाऊ शकते. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या म्युचुअल फंडची मालमत्ता 220 कोटी रुपये होती आणि 31 ऑगस्ट 2021 पर्यंत खर्चाचे प्रमाण 0.16 टक्के होते. या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2013 रोजी करण्यात आली होती.

आयडीबीआय इंडिया टॉप 100 इक्विटी फंड :
या म्युचुअल फंडाने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना 15.96 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. 5 वर्षांपूर्वी ज्यांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती त्यांना आज 2.10 लाख रुपये परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, 10,000 रुपयांच्या मासिक SIP गुंतवणुकीचे मूल्य 10.40 लाख रुपये झाले आहे. या म्युचुअल फंड योजनेत, किमान एकरकमी 5,000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते, तर किमान 500 रुपयांची SIP सुरू केली जाऊ शकते. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या म्युचुअल फंडाची मालमत्ता 547 कोटी रुपये नोंदवण्यात आली होती. आणि 31 ऑगस्ट 2021 पर्यंत खर्चाचे प्रमाण 1.34 टक्के होते. योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2013 रोजी करण्यात आली होती.

IDBI फ्लेक्सी कॅप फंड :
या म्युचुअल फंडाने ही मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांनान दुप्पट परतावा मिळवून दिला आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना 15.94 टक्के वार्षिक परतावा मिळाला. यामध्ये 5 वर्षांपूर्वी ज्यांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती त्यांना आज 2.09 लाख रुपये परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, 10,000 रुपयांच्या मासिक SIP गुंतवणुकीचे मूल्य 10.41 लाख रुपये झाले आहे. या योजनेत, किमान एकरकमी 5,000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते, तर SIP गुंतवणूक किमान 500 रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते. 30 सप्टेंबर 2021 रोजी या म्युचुअल फंडाची मालमत्ता 379 कोटी रुपये होती. 31 ऑगस्ट 2021 रोजी फंडाचे खर्चाचे प्रमाण 1.17 टक्के होते. या योजनेची सुरुवात 28 मार्च 2014 रोजी करण्यात आली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IDBI mutual fund long term investment return on 2 August 2022.

हॅशटॅग्स

IDBI(1)mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x