श्रीगोंदा : भारतीय जनता पक्ष व काँग्रेस-एनसीपी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे. काँग्रेस-एनसीपी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे दणदणीत विजयी झाल्या. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा एकूण २१०० मतांनी पराभव केला.
भारतीय जनता पक्षाने ११ जागांवर विजय प्राप्त केला असून, आघाडीने ८ जागांवर विजय मिळविला. आघाडीच्या संगिता मखरे, राजू लोखंडे, गणेश भोस, सुनीता खेतमाळीस यांनी विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पक्षाच्या दिपाली औटी, संग्राम घोडके विजयी झाल्या आहेत. प्रभाग ७ मधून आघाडीचे निसार बेपारी आणि सोनल घोडके यांनी विजय मिळविला आहे. तसेच प्रभाग ६ मधून भारतीय जनता पक्षाच्या अशोक खेंडके, मनिषा लांडे यांनी विजय प्राप्त केला आहे.
