2 May 2025 7:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

सुप्रीम कोर्टाच्या टिपण्यांनी धाकधूक वाढवली | फडणवीस दिल्लीला रवाना, तर शिंदेंना थकवा जाणवू लागल्याने आरामाचा सल्ला

DCM Devendra Fadnavis

CM Eknath Shinde | आजच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीशांनी केलेल्या विविध टिपण्या शिंदे गटात हादरा देऊन गेल्याच वृत्त आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने बाजू मांडणारे हरीश साळवे यांनी ‘जरी विधानसभा सदस्यत्व गेलं तरी’ असा वाक्य प्रयोग बाजू मांडताना केल्याने भलतीच शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यात अचानक इतर वृत्त समोर आली आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवू लागला :
सतत दौऱ्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थकले आहे. त्यामुळे शिंदेंनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. राज्यात सत्ता आल्यापासून सातत्याने दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवू लागला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याने शिंदे यांनी सर्व त्यांचे सर्व प्रशासकीय आणि राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत.

दुसरीकडे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले परंतु, अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी काल सांगितले होते की येत्या रविवार पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. आणि फडणवीस तातडीने दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर देवेंद्र फडणवीस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. फडणवीस तातडीने दिल्लीला का गेले याचे उलट सुलट अर्थ लावले जात आहेत.

मंत्रिमंडळाचा विस्तार अजून लांबणीवर :
दरम्यान, उद्या 5 ऑगस्ट रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सर्व कार्यक्रमही रद्द केले आहेत. मात्र हे सर्व विषय अचानक सर्वोच्च न्यायालयाच्या विविध टिपण्यानंतर पुढे आल्याने वेगळीच शंका राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येतं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title:  DCM Devendra Fadnavis moved for New Delhi after Supreme Court hearing check details 04 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या