
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड एसआयपी हा असा एक गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही नियमित लहान बचतीतूनही इक्विटी जबरदस्त मल्टीबॅगर परतावा मिळवू शकता. म्युच्युअल फंड एसआयपी हा असा एक गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही नियमित लहान बचतीतूनही जबरदस्त परतावा मिळवू शकता. तुमच्या मासिक उत्पन्नातून दर महिन्याला बचतीची सवय लावा. आणि त्या बचतीला म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याची सवय लावा. तर तुम्ही भविष्यात लाखो रुपयांचा परतावा सहज मिळवू शकता.
म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूक:
SIP द्वारे गुंतवणूक करणे खूप सोपे आणि सरळ आहे. यामध्ये तुम्ही दरमहा किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतो. दीर्घ कालावधीसाठी SIP मधून चक्रवाढीचा प्रचंड फायदा होतो. यामध्ये तुम्ही तुमच्या अपेक्षित परताव्यानुसार दर महिन्याला गुंतवणुकीच्या रकमेचा अंदाज लावू शकता. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर SIP मध्ये गुंतवणूकदारांना सरासरी 12 टक्के किंवा त्याहून अधिक परतावा मिळतो.
SIP गुंतवणूक परतावा :
पुढील 10 वर्षात 50 लाख परतावा कसा मिळवायचा हे आपण जाणून घेऊ. जर तुम्हाला पुढील 10 वर्षात 50 लाखांचा परतावा मिळवायचा असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी, नियमित गुंतवणूक करावी लागेल. जर आपण 10 वर्षांच्या एसआयपी परताव्याचा विचार केला तर अशा अनेक योजना आहेत, ज्यांचा सरासरी परतावा 14 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
SIP कॅल्क्युलेटर नुसार, जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक सरासरी 12 टक्के परतावा अपेक्षित असेल, तर पुढील 10 वर्षात 50 लाखांचा परतावा मिळवण्यासाठी, तुम्हाला दरमहा 22,000 रुपये SIP गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 10 वर्षात तुमच्या कडे 51.1 लाख रुपये चा निधी तयार होईल. ज्यामध्ये तुमची गुंतवणूक 26.4 लाख रुपये आणि त्यावरील परतावा लाभ 24.7 लाख रुपये असेल. जर सरासरी परतावा कमी किंवा जास्त असेल, तर तुमचा परतावा ही कमी किंवा जास्त असू शकतो.
22% पर्यंत परतावा :
म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी दिलेला एसआयपी परतावा गेल्या 10 वर्षांमध्ये सरासरी 14 टक्के पेक्षा जास्त आहे. मोतीलाल ओसवाल NASDAQ 100 ETF फंडाचा सर्वाधिक वार्षिक परतावा 22.61 टक्के आहे. याशिवाय, निपॉन Ind ETF फंड ने दिलेला वार्षिक परतवा 13.61 टक्के इतका होता. काँटम इक्विटी FoF ने दिलेला वार्षिक परतावा 13.02 टक्के होता. ICICI सेन्सेक्स ने दिलेला वार्षिक परतावा 12.9 टक्के होता. अश्या अनेक म्युचुअल फंडानी सरासरी 12 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
SIP गुंतवणुकीचा सोपा मार्ग :
एसआयपी ही गुंतवणुकीची सोपी आणि पद्धतशीर गुंतवणूक पद्धत आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूकदाराला थेट बाजारातील जोखमीचा सामना करावा लागत नाही. त्याच वेळी, परतावा देखील पारंपारिक उत्पन्नापेक्षा जास्त आहे. मात्र, म्युचुअल फंड देखील बाजाराच्या अधीन असल्यामुळे बाजारातील चढ आणि उताराचा धोका म्युचुअल फंड मध्येही आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराने त्याचे उत्पन्न, लक्ष्य आणि जोखीम क्षमता, प्रोफाइल यांचा विचार करूनच म्युचुअल फंड गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. याद्वारे तुम्ही गुंतवणुकीची सवय, जोखीम आणि त्यावरील परताव्याचे आकलन सहजपणे जाणून आणि समजून घेऊ शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.