16 December 2024 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Multibagger Stocks | या टॉप टेन मायक्रोकॅप मल्टीबॅगर स्टॉक्सची लिस्ट सेव्ह करा, गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने वाढवत आहेत

Multibagger Stocks

Multibagger Stocks | ऑक्टोबर 2022 मध्ये भारतीय स्टॉक मार्केटमध्ये सुधारणा पाहायला मिळाली होती. मागील महिन्यात BSE आणि Sensex मध्ये 3300 अंकांची वाढ पाहायला मिळाली आहे. जगातील सर्व शेअर बाजारांनी हेडलाइन इंडेक्सपेक्षा निराशाजनक कामगिरी केली असून अशा पडझडीच्या मंदीच्या काळातही अनेक लहान शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. 200 कोटींपेक्षा कमी बाजार भांडवल असलेल्या असे अनेक मायक्रोकॅप कंपनीचे शेअर्स आहेत, ज्यांनी लोकांना मजबूत परतावा कमवून दिला आहे. मागील फक्त एका महिन्यात, या सर्व मायक्रोकॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 172 टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. अशा अनेक कंपन्यांचा आहेत, ज्यांची नावेही तुम्ही ऐकली नसणार, आणि तुम्हाला माहित ही नसेल की हे कंपन्या किती परतावा देतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत.

K&R Rail Engineering :
ऑक्टोबर 2022 मध्ये या कंपनीच्या शेअर्सची 172 टक्क्यांनी वाढली होती, आणि गुंतवणूकदारांनी यातून भरघोस परतावा कमावला होता. या कंपनीचे बाजार भांडवल फ्लॅट 120 कोटी आहे. K&R Rail Engineering कंपनी ही एक अभियांत्रिकी, डिझाइन आणि बांधकाम म्हणजेच EDC कंपनी आहे. सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 76.05 रुपये आहे.

शारदा प्रोटीन्स :
खाद्यतेलाचे व्यवहार करणाऱ्या या कंपनीचे बाजार भांडवल 43 कोटी रुपये आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर 93.8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 31 ऑक्टोबर 2022 रोजी हा कंपनीच्या शेअरची किंमत 236.35 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच ऑक्टोबर 2022 या एका महिन्यात कंपनीने आपल्या शेअर धारकांना 152 टक्के नफा कमावून दिला आहे.

वेल्टरमन इंटरनॅशनल :
या लेदर आणि लेदर प्रोडक्ट्सचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्सही ऑक्टोबर 2022 मध्ये 152 टक्क्यांनी वधारले आहेत.

अल्स्टोन टेक्सटाईल :
ही दिल्ली स्थित टेक्सटाईल कंपनी परतावा देण्याच्या बाबतीत या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 151 टक्क्यांनी वाढली आहे.

गुजरात टूलरूम :
गुजरात टूलरूम कंपनी ऑक्टोबर 2022 या एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 150 टक्के पेक्षा अधिक परतावा कमवून दिला आहे. 31 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर 67.6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

नारायणी स्टील :
या कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यात 150 टक्क्यांनी वधारले आहेत. 30 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑक्टोबर 2022 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 63 रुपयांवर गेली होती. या कंपनीचे बाजार भांडवल 3 कोटी रुपये आहे.

काकतिया टेक्सटाइल्स :
या कंपनीच्या शेअर्सची किंमत 148 टक्क्यांनी वधारली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 54 कोटी असून ही कंपनी कापसाचे धागे निर्मिती आणि विणकाम करण्याचे उद्योग करते.

आरटी एक्सपोर्ट्स :
या कंपनीच्या शेअर्सची किंमत ऑक्टोबर 2022 मध्ये 147 टक्क्यांनी वाढली आहे. ही कंपनी कृषी उत्पादनांचे निर्यात करणे आणि स्थानिक खरेदी विक्री करण्याच्या व्यापारात गुंतलेली आहे.

वेस्ट लीझर रिसॉर्ट्स :
या कंपनीच्या शेअर्सची किंमत ऑक्टोबर 2022 मध्ये 147 टक्क्यांनी वर गेली आहे. ही कंपनी पर्यटन उद्योगात सक्रिय आहे.

RMC स्विचगियर्स :
या कंपनीच्या शेअर्सनी ऑक्टोबर 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना 146 टक्क्यांचा परतावा कमवून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 173 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः एनर्जी मीटरसाठी एनक्लोजर, लो टेंशन-हाय टेंशन डिस्ट्रिब्युशन बॉक्स आणि पॅनेलचे उत्पादन करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Microcap companies share price return on investment on 04 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(458)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x