
Multibagger Mutual Funds | आजच्या काळात चांगला परतावा हवा असेल तर गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा बेस्ट पर्याय मानला जातो. म्युचुअल फंड हे असे साधन आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदाराला त्याच्या सोयीनुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडता येतो. त्यात गुंतवणूकदार एकतर एकरकमी गुंतवणूक करू शकतो किंवा दुसरा पर्याय म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे दरमहा मासिक गुंतवणूक करू शकतो. सध्या तर, तुम्ही SIP द्वारे महिन्याला फक्त 100 रुपये टाकून गुंतवणूक सुरू करू शकता. बाजारातील जोखमीच्या अधीन असल्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर बाजारातील अस्थिरतेचा देखील परिणाम होतो. म्हणजेच ह्या गुंतवणुकीतही धोका असतोच. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत ज्यांनी दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. अशा 5 योजनांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी मागील लोकांना 10 वर्षांत 10 पट जास्त परतावा दिला आहे.
एसबीआय स्मॉल कॅप फंड :
9 सप्टेंबर 2009 रोजी SBI स्मॉल कॅप फंड योजनेची सुरुवात झाली होती. ह्या म्युच्युअल फंड ने मागील 10 वर्षात लोकांना 25 टक्के पेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे. 10 वर्षांपूर्वी या योजनेत गुंतवलेल्या 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 9.66 लाख रुपये झाले आहे. त्याच वेळी, 10,000 मासिक SIP चे गुंतवणुकीचे मूल्य 47.90 लाख रुपये झाले आहे. या योजनेतील किमान गुंतवणूक मर्यादा 5,000 रुपये आहे. त्याच वेळी, किमान एसआयपी गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आहे.
डीएसपी स्मॉल कॅप फंड :
14 जून 2007 रोजी डीएसपी स्मॉल कॅप फंड या म्युचुअल फंड योजनेची सुरूवात करण्यात आली होती. मागील 10 वर्षात या म्युचुअल फंडने लोकांना सुमारे 22 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. 10 वर्षांपूर्वी या योजनेत जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे गुंतवणूक मूल्य 7.26 लाख रुपये झाले असते. त्याच वेळी, 10,000 रुपये मासिक SIP चे गुंतवणूक मूल्य आज 40.19 लाख रुपये झाले असते. या म्युचुअल फंड योजनेत किमान गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आहे. त्याच वेळी, किमान एसआयपी गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आहे.
कोटक स्मॉल कॅप फंड :
24 फेब्रुवारी 2005 रोजी कोटक स्मॉल कॅप फंड योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या म्युचुअल फंडाने मागील 10 वर्षांत गुंतवणूकदारांना 21 टक्क्यांहून अधिक वार्षिक परतावा मिळवून दिला आहे.10 वर्षांपूर्वी या योजनेत ज्यांनी 1 लाख रुपयांची गुंतवणुक केली होती, त्यांचे गुंतवणूक मूल्य आज 6.90 लाख रुपये झाले आहे. त्याच वेळी, 10,000 रुपये मासिक SIP चे मूल्य 41.18 लाख रुपये झाले आहे. या योजनेत किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा 5,000 रुपये आहे. त्याच वेळी, किमान SIP गुंतवणूक मर्यादा 1,000 रुपये आहे.
एचडीएफसी स्मॉल कॅप फंड :
3 एप्रिल 2008 रोजी HDFC स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजना सुरू करण्यात आली होती. मागील 10 वर्षात या म्युचुअल फंड ने आपल्या गुंतवणूकदारांना 18 टक्के पेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे. 10 वर्षांपूर्वी या योजनेत गुंतवलेल्या 1 लाख रुपयांचे मूल्य आज 5.61 लाख रुपये झाले आहे. त्याच वेळी, 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणुकीचे मूल्य 35.13 लाख रुपये झाले आहे. या योजनेत किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा 5,000 रुपये आहे. त्याच वेळी, किमान एसआयपी गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आहे.
ICICI प्रुडेन्शियल स्मॉल कॅप फंड :
18 ऑक्टोबर 2007 रोजी ICICI प्रुडेन्शियल स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना सुरू करण्यात आली होती. मागील 10 वर्षांत या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्क्यांहून अधिक वार्षिक परतावा दिला आहे. 10 वर्षांपूर्वी या योजनेत ज्यानी 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 5.18 लाख रुपये झाले आहे. त्याच वेळी, 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणुकीचे मूल्य 32.35 लाख रुपये झाले आहे. या योजनेत किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा 5,000 रुपये आहे. त्याच वेळी, किमान SIP गुंतवणूक मर्यादा 100 रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.