1 May 2024 9:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Mutual Funds | 3 पट परतावा देणाऱ्या योजना आणि 5 स्टार रेटिंग, या म्युच्युअल फंड योजना तुम्हाला भरघोस परतावा देतील

mutual fund

Mutual Funds | लहान बचत किंवा इक्विटी योजनामध्ये निश्चित उत्पन्न परतावा असलेल्या योजनेच्या तुलनेत अधिक पट जास्त परतावा मिळू शकतो, परंतु यासाठी योग्य योजना शोधून त्यात गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.

5 स्टार रेटेड म्युच्युअल फंड योजना:
भांडवली बाजारात गुंतवणुक करण्यासाठी अनेक पर्याय अपलब्ध आहेत,ज्यात इक्विटीवर उच्च परतावा मिळतो. जर तुम्हाला स्टॉकमध्ये थेट पैसे गुंतवायचे नसतील तर म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. येथे तुमची गुंतवणूक वैविध्यपूर्ण अशी असते. लहान बचत योजना किंवा इक्विटी योजनेतील गुंतवणूक निश्चित उत्पन्न परतावा असलेल्या योजनेच्या तुलनेत अधिक जास्त परतावा मिळून देते. परंतु यासाठी योग्य योजना ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही एखादी चांगली गुंतवणूक योजना शोधत असाल, तर अशा फंडांवर लक्ष ठेवा ज्यांचे रेटिंग 5 स्टार आहे. 5 स्टार रेटिंग असलेले फंड बहुतेक सर्व पॅरामीटर्सची पूर्तता करतात, ज्यामुळे त्यांना उच्च रेटिंग असते.

योजनांच्या खर्चाचे प्रमाण :
मार्केटमध्ये अशा खूप 5 स्टार रेटेड म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यांनी खूप कमी कमी काळात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये पाच वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट आणि तिप्पट वाढले आहेत. बीपीएन फिनकॅपचे संचालक म्हणतात की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या म्युचुअल फंडामध्ये त्यांच्यामध्ये खर्चाचे प्रमाणही खूप कमी आहे, म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीची किंमत खूप कमी होते. 5 स्टार रेटिंग असलेल्या चांगल्या म्युचुअल फंड योजनेमध्ये एकरकमी गुंतवणूक आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हे दोन्ही पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतात. SIP मध्ये तुम्हाला एकरकमी रक्कम गुंतवण्याऐवजी दे महिन्याला पैसे गुंतवण्याची सुविधा मिळते. या योजनांमध्ये किमान 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवणे शहाणपणाचे आहे, कारण तुम्हाला चांगला परतावा दीर्घ काळातच मिळेल.

क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर डायरेक्ट म्युचुअल फंड :
* 5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा : 23 टक्के
* वार्षिक SIP वर 5 वर्षात परतावा : 34 टक्के
* 5 वर्षात 1 लाखाचे गुंतवणूक मूल्य : 2.80 लाख रुपये
* 5000 मासिक SIP चे 5 वर्षांत मूल्य : 6.5 लाख रुपये
* खर्चाचे प्रमाण : 0.67 टक्के (30 जून 2022)

या फंडात किमान 5000 रुपयांची एकरकमी गुंतवणूक करता येते. त्याच वेळी, एसआयपी गुंतवणूक मर्यादा फक्त 1000 रुपये आहे. 31 जुलै 2022 रोजी या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 621 कोटी रुपये होती.

पीजीआयएम इंडिया मिडकॅप फंड :
* एकरकमी गुंतवणुकीवर 5 वर्षांत परतावा : 20 टक्के
* SIP वर वार्षिक परतावा : 30 टक्के
* 5 वर्षांत 1 लाख रुपयांचे मूल्य : 6.10 लाख
* 5000 रुपये मासिक SIP चे मूल्य : 2.52 लाख रुपये
* खर्चाचे प्रमाण: 0.45 टक्के (30 जून 2022)

या फंडात किमान एकरकमी गुंतवणूक माऱ्यदा 5000 रुपयांची आहे. त्याच वेळी, एसआयपी गुंतवणूक फक्त 1000 रुपयांपासून सुरू करू शकता. 30 जून 2022 पर्यंत या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 5,169 कोटी रुपये होती.

ॲक्सिस स्मॉल कॅप डायरेक्ट फंड :
* 5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा : 21 टक्के
* SIP वर 5 वर्षात परतावा : 26 टक्के वार्षिक
* 5 वर्षात 1 लाख रुपयांचे मूल्य : 2.55 लाख रुपये
* 5000 मासिक SIP चे मूल्य : 5.7 लाख रुपये
* खर्चाचे प्रमाण : 0.49 टक्के (30 जून 2022)

या फंडात किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा फक्त 5000 रुपयांची आहे. त्याच वेळी, एसआयपी गुंतवणूक मर्यादा फक्त 500 रुपये आहे. 30 जून 2022 पर्यंत या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 8,956 कोटी रुपये होती.

एसबीआय काँट्रा डायरेक्ट म्युचुअल फंड :
*5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा : 16 टक्के
*SIP वर 5 वर्षात परतावा : 24 टक्के वार्षिक
*5 वर्षात 1 लाखाचे मूल्य : 2 लाख रुपये
*5000 मासिक SIP चे मूल्य : 5.8 लाख रुपये
*खर्चाचे प्रमाण : 1.27 टक्के (30 जून 2022)

या फंडात किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा 5000 रुपयांची आहे. त्याच वेळी, एसआयपी गुंतवणूक मर्यादा फक्त 500 रुपये आहे. 30 जून 2022 पर्यंत या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 4,670 कोटी रुपये होती.

मिराये टॅक्स सेविंग म्युचुअल फंड योजना :
*5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा : 19 टक्के
*SIP वर 5 वर्षात परतावा : 22 टक्के
*5 वर्षात 1 लाख रुपयांचे मूल्य : 2.14 लाख रुपये
*5000 मासिक SIP मूल्य : 5 लाख रुपये
*खर्चाचे प्रमाण: 0.57 % (30 जून 2022)

या म्युचुअल फंडात किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा 500 रुपयांची आहे. त्याच वेळी, एसआयपी मध्ये गुंतवणूक मर्यादा केवळ 500 रुपये आहे. 30 जून 2022 पर्यंत या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 11,495 कोटी रुपये होती.

अॅक्सिस मिडकॅप फंड :
* 5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा : 19 टक्के
* SIP वर 5 वर्षात परतावा : 21% वार्षिक
* 5 वर्षात 1 लाख रुपयांचे मूल्य : 2.36 लाख रुपये
* 5000 मासिक SIP चे मूल्य : 5 लाख रुपये
* खर्चाचे प्रमाण: 0.51 टक्के (30 जून 2022)

या फंडात किमान एकरकमी गुंतवणूक मर्यादा 5000 रुपयांची आहे. त्याच वेळी, एसआयपी गुंतवणूक मर्यादा केवळ 500 रुपयांची आहे. 30 जून 2022 पर्यंत फंडाची एकूण मालमत्ता 16,567 कोटी रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Top mutual funds with five star ratings on 11 August 2022.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x