28 September 2022 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vivo X Fold Plus | जबरदस्त डिस्प्लेसह विवो X Fold Plus स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स Post Office Scheme | विश्वसनीय सरकारी योजना, 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 16 लाखाचा परतावा मिळवा, योजनेचा तपशील जाणून घ्या Navi Mutual Fund | होय हे खरं आहे, अवघ्या 10 रुपयांपासून या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा, लाखोमध्ये परतावा मिळवा Mobile Safety | तुम्हाला प्रवासादरम्यान मोबाइल चोरीला जाण्याची भीती आहे?, इथे ऑनलाईन नोंदणी करा, टेन्शन मुक्त व्हा Property Buying | घरांच्या किंमती लवकरच वाढणार, प्रॉपर्टी खरेदीची हीच योग्य वेळ, ही आकडेवारी जाणून घ्या Xiaomi CIVI 2 Smartphone | शाओमीने आपला नवा स्मार्टफोन CIVI 2 लाँच केला, तगडे फिचर्स आणि बरंच काही मिळणार JioPhone 5G | जिओ 5G स्मार्टफोनची किंमत इतकी स्वस्त असणार आहे, किंमत आणि फीचर्सचा तपशील जाणून घ्या
x

Hot Stocks | या शेअरने 1 महिन्यात 36 टक्के परतावा, 6 महिन्यांत 70 टक्के आणि 1 वर्षात 117 टक्के परतावा दिला, असे स्टॉक मिस करू नका

Hot Stocks

Hot Stocks | शेअर बाजार बातमी आणि टिप्सवर प्रतिक्रिया देत असतो, कधी सकारात्मक बातमी आली तर कंपनीचे स्टॉक वाढू शकतात, जेर कधी नकारात्मक बातमी आली, तर मोठ मोठे स्टॉक देखील खाली पडू शकतात. आज आम्ही तुम्हाला अश्या एका कंपनीची माहिती देणार आहोत, ज्याबद्दल एक बातमी आली आणि शेअर्सनी त्यावर प्रतिक्रिया म्हणून जबरदस्त उसळी घेतली. नक्कीच शेअर बाजारातील सकारात्मक आणि नकारात्मक बातमीचा परिणाम स्टॉकच्या कामगिरीवरही होत असतो.

जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीशी संबंधित एक बातमी आली, त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड प्रमाणत वाढ पाहायला मिळाली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली, आणि शेअर्स 131 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीने सेबीला नुकताच दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे.

कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, 27 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत बोर्डाचे सर्व सदस्य बोनस शेअर जाहीर करण्याबाबत चर्चा करतील. जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट कंपनी रेल्वे, रस्ते आणि विमानतळांच्या पायाभूत सुविधांबाबत सेवा पुरवण्याचे काम करते. l

कंपनीच्या स्टॉकची कामगिरी :
मागील एका महिन्यात GPT इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीच्या शेअर्समध्ये 36.39 टक्के वाढ नोंदविण्यात आली होती. त्याच वेळी, जर 6 महिन्यांपूर्वी तुम्ही ह्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली असती तर, तुम्हाला आतापर्यंत 70.40 टक्के परतावा मिळाला असता. चालू वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 47.42 टक्केचा परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात GPT इन्फ्राप्रोजेक्ट्सच्या शेअर्सची किमत 45.26 टक्क्यांनी वाढली होती.

उच्चांक आणि नीचांक पातळी :
GPT इन्फ्राटेक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 131.55 रुपये आहे. त्याच वेळी, 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 66.80 रुपये होती. कंपनीचे बाजार भांडवल 360.52 कोटी रुपये आहे. या स्टॉकने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना एकूण 117 टक्केचा मल्टी बॅगर परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot Stock GPT infratech share price return on 22 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x