 
						PPF Investment | PPF या सरकारी योजनेची खास वैशष्ट्ये म्हणजे तुम्ही या योजनेत किमान 500 रुपयेपासून ते कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. आजच्या काळात प्रत्येकजण आपले आर्थिक भविष्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या भविष्यासाठी आतापासूनच पैसे बचत करायला सुरुवात केली तर दीर्घकाळ गुंतवणूक केल्यावर तुम्ही करोडोंचा नफा मिळवू शकता. अनेकदा लोकं पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात कारण ही एक सरकार द्वारे संचालित गुंतवणूक योजना आहे.
गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित :
या योजनेमध्ये गुंतवणूकदारांचा पैसा तर सुरक्षित राहतोच शिवाय त्यांना दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास भरघोस परतावाही मिळतो. तर तुम्ही यायोजनेत जास्त परतावा मिळवण्यासाठी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला जबरदस्त नफा तर मिळणारच सोबत तुम्हाला यात कर सवलतीचा देखील लाभ मिळेल. PPF ची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये किमान 500 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपयांची आहे. यामुळेच लोकांमध्ये ही गुंतवणूक योजना खूप प्रसिद्ध आहे. चला जाणून घेऊया पीपीएफमध्ये गुंतवणूक कशी करायची ?
गुंतवणुकीवर परतावा :
पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दरमहा किमान मासिक 500 रुपये जमा करावे लागतात. तुम्ही रोज फक्त 100 रुपये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर, तुमच्या पीपीएफ खात्यात एका वर्षात 36000 रुपये जमा होतील. पुढील 15 वर्षांत तुमच्या पीपीएफ खात्यात सुमारे 5,40,000 रुपये जमा असतील. जेव्हा तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक चक्रवाढ पद्धतीने 7.1 टक्के व्याज दिला जाईल, तेव्हा तुम्हाला मॅच्युरिटीनंतर तब्बल 9,76,370 रुपये परतावा मिळेल. या योजनेत एका आर्थिक वर्षात गुंतवणुकीची कमाल मर्यादा 1.5 लाख आहे. तुम्ही एका वर्षात दीड लाखापेक्षा जास्त पैसे गुंतवणूक करू शकत नाही.
मुदतपूर्तीनंतर 5 वर्षांची मुदतवाढ :
PPF खात्यावर 15 वर्षांचा लॉक इन कालावधी असतो. म्हणजे या योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे आहे. परंतु, यानंतर जर तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू ठेवू इच्छिता तर तुम्हाला ही सुविधा देखील दिली जाते. PPF मध्ये तुम्ही तुमच्या योजनेच्या गुंतवणुकीचा कालावधी पुढील 5 वर्षांसाठी वाढवू शकता. तुम्ही एकूण २० वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. मॅच्युरिटी मर्यादा कालावधी वाढवू शकता. तथापि, मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्याच्या 1 वर्ष आधी, तुम्हाला एक अर्ज करावा लागेल की तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीची त्मुदतवाढ हवी आहे. 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तुम्ही ती पुन्हा 5 वर्षांसाठी वाढवू शकता.
5 वर्षांचा लॉक इन कालावधी :
पीपीएफ खात्यातून पैसे काढण्याचा लॉक-इन कालावधी 5 वर्ष ठेवण्यात आला आहे. म्हणजे खाते उघडल्यानंतर 5 वर्षांपर्यंत तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही. हा पाच वर्षाचा लॉक इन कालावधी पूर्ण झाल्यानंतर, फॉर्म नंबर 2 भरून तुमची तुमच्या खात्यातून प्री-विड्रॉवल करू शकता. पण 15 वर्ष मुदत पूर्ती होण्याआधी तुम्हाला सर्व रक्कम काढता येत नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		