4 May 2024 11:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

EPFO Money | ईडीएलआय योजनेत ईपीएफ खातेधारकांना मिळणार 7 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

EPFO Money

EPFO Money | ईपीएफओद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक योजनांपैकी एक म्हणजे एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अर्थात ईडीएलआय स्कीम. ईपीएफओ सदस्यांना या योजनेद्वारे विम्याचा लाभ मिळतो. अपघाती मृत्यू झाल्यास ईपीएफओ आपल्या सदस्यांच्या कुटुंबीयांना विमा संरक्षणाचा लाभ देते.

सात लाख रुपयांपर्यंत विम्याची रक्कम :
‘ईपीएफओ’च्या ईडीएलआय योजनेअंतर्गत ग्राहकाच्या नामनिर्देशित व्यक्तीला वेळेआधी मृत्यू झाल्यास सात लाख रुपयांपर्यंत विम्याची रक्कम दिली जाते. जर एखादी व्यक्ती ईपीएफओची सदस्य असेल आणि तिने 12 महिने सलग काम केले असेल तर अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यांना 7 लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ दिला जाईल.

वर्षभरात एकापेक्षा अधिक संस्थांमध्ये काम केलेल्यांसाठीही हे विमा संरक्षण उपलब्ध आहे. कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांच्या वतीने विम्याचा दावा करता येतो. ईडीएलआय योजनेतील दावेदार सदस्य कर्मचाऱ्याचा नामनिर्देशित असावा. अनेक कारणांमधून अगदी कोरोनाने मृत्यू झाल्यानंतरही या विमा संरक्षणाचा लाभ मिळतो.

पैसे द्यावे लागणार नाहीत :
ईपीएफओच्या ईडीएलआय योजनेंतर्गत विमा घेण्यासाठी प्रीमियम म्हणून आपल्याला कोणतेही वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत. या योजनेत योगदान नियोक्ता म्हणजेच आपण ज्या संस्थेत काम करत आहात त्या संस्थेकडून दिले जाते.

दावा कसा करावा :
ईपीएफओ सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास, त्याचा नामनिर्देशित व्यक्ती किंवा उत्तराधिकारी या विमा संरक्षणाचा दावा करू शकतात. दावा करण्यासाठी विमा कंपनीने कर्मचाऱ्याचा मृत्यू दाखला, उत्तराधिकार प्रमाणपत्र, अल्पवयीन नामनिर्देशित व्यक्तीच्या वतीने अर्ज करणारे पालक प्रमाणपत्र व बँक तपशील देणे आवश्यक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: EPFO Money account holders will get Rs 7 lakh EDLI scheme know full details check details 12 August 2022.

हॅशटॅग्स

#EPFO Money(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x