29 April 2024 8:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा

Small Saving Schemes investment

Small Saving Schemes | आज आम्ही तुम्हाला अशा काही योजनांबद्दल माहिती देणार आहोत ज्यात तुम्ही बचत करून कर ही वाचवू शकता आणि पैसे गुंतवून चांगला नफा देखील मिळवू शकता. या योजनेत आयकराच्या कलम 80C अंतर्गत, तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर सवलत मिळवू शकता.

लहान बचत योजना :
आता फक्त EPFO मध्ये एका आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त मानली जाते. वरच्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर EPF अंतर्गत कर आकारला जाईल. याचा अर्थ जर तुम्ही वार्षिक 3 लाख रुपये गुंतवणूक केली असेल तर अडीच लाख रुपयांच्या वरील 50 हजारांवर मिळणारे व्याज तुमच्या आयकर स्लॅबच्या दराने त्यावर कर आकारला जाईल. अशा परिस्थितीत करमाफीचा पर्याय शोधण्यासाठी गुंतवणूकदार इतर पर्याय शोधत असतात. अशा काही जबरदस्त योजना आहेत ज्यात तुम्ही कर ही वाचवू शकता आणि वाचलेले पैसे गुंतवून त्यावर चांगले व्याज ही मिळवू शकता.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते यात फक्त 500 रुपयांच्या नाममात्र रकमेने गुंतवणूक खाते उघडता येते. प्रत्येक वर्षी 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे. खात्यात दरवर्षी कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येतात. या योजनेचा कालावधी 15 वर्ष आहे. 15 वर्षांनंतर तुम्ही ते 5-5 वर्षांसाठी पुढे वाढवू शकता. खाते 15 वर्षापूर्वी बंद करण्यास बंधन आहेत, परंतु 3 वर्षानंतर तुम्ही या खात्यावर कर्ज घेऊ शकता. कोणाला जर पैसे हवे असेल तर, नियमांनुसार योजना सुरू केल्या पासून सातव्या वर्षानंतर पीपीएफ खात्यातून तुम्हाला पैसे काढता येतील. दर तीन महिन्यांनी सरकारकडून व्याजदरांचे पुनरावलोकन केले जाते. सध्या PPF वर 7.1% व्याज परतावा दिला जातो. ही योजना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कुठेही जाऊन सुरू करता येते. कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या शाखेत हस्तांतरण सुविधा देखील उपलब्ध आहे.

किसान विकास पत्र :
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत 6.9 टक्के व्याज परतावा दिला जातो. KVP योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. या योजनेत किमान गुंतवणूक 1000 रुपयेपासून करावी लागते. गुंतवणूकदाराचे वय किमान 18 पूर्ण वर्षे असावे. सिंगल अकाउंट व्यतिरिक्त जॉइंट अकाउंट सुरू करण्याची ही सुविधाही आहे. या योजनेत अल्पवयीन मुलेही खाते उघडून गुंतवणूक करू शकतात. मात्र, वय पूर्ण होईपर्यंत खात्याची काळजी पालक घेऊ शकतात. योजनेत अडीच वर्षांचा लॉक-इन कालावधी देण्यात आला आहे. तुम्हाला तुमची वार्षिक गुंतवणूक काढायची असेल, तर तुम्हाला किमान अडीच वर्षे वाट पाहावी लागेल.आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत या ठेवींवर कर सूट दिली जाते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र :
NSC खाते उघडण्यासाठी, तुम्हाला किमान 1000 रुपये पासून गुंतवणूक सुरुवात करावी लागेल. पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमधील गुंतवणुकीवर 6.8 टक्के वार्षिक व्याज परतावा मिळत आहे.व्याज परताव्याची गणना वार्षिक आधारावर होईल. परंतु व्याजाची रक्कम गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यावरच दिली जाते. अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने खाते सुरू करता येते. 3 प्रौढांच्या नावाने ही संयुक्त गुंतवणूक खाते उघडता येते. पालकांच्या देखरेखीखाली 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने या योजनेत गुंतवणूक खाते उघडता येते. NSC मध्ये तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकता. गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही.

इक्विटी लिंक्ड बचत योजना :
भारतात अश्या 42 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत ज्या कर बचत योजनेची सुविधा देत आहेत. आयकर वाचवण्यासाठी प्रत्येक कंपनीकडे ELSS असते. ईएलएसएस ऑनलाइन किंवा एजंटद्वारे घरी बसून तुम्ही गुंतवणूक करू शकता. आयकर वाचवण्यासाठी तुम्हाला एकदाच गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही किमान 5 हजार रुपये जमा करू शकता. जर तुम्हाला दरमहा गुंतवणूक करायची असेल तुम्ही दरमहा किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येईल. तुम्हाला या योजनेत 1.5 लाख रुपयांची कमाल कर सूट मिळू शकते. परंतु गुंतवणूकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. आयकर बचत योजनांमधील गुंतवणूक 3 वर्षांसाठी लॉक-इन आहे. यानंतर गुंतवणूकदार इच्छित असल्यास हे पैसे काढू शकतो. 3 वर्षांनंतर पूर्ण किंवा आंशिक पैसे काढता येतात. उरलेली रक्कम ELSS मध्ये तुम्हाला पाहिजे तितका काळ तुम्ही ठेवू शकता. गुंतवणुकीवर व्याजदराऐवजी मार्केट लिंक रिटर्न दिला जातो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Small Saving Schemes investment returns on 12 August 2022.

हॅशटॅग्स

Small Saving Schemes investment(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x