2 May 2024 7:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Loan Transfer | कर्ज हस्तांतरित करण्यापूर्वी काय करावे हे माहिती करून घ्या, यामुळे EMI होईल कमी, आर्थिक नुकसान होणार नाही

Loan transfer

Loan Transfer | आपण बँकांकडून कर्ज घेतो, आणि नंतर आपल्याला कळते की आपण ज्या बँक मधून कर्ज घेतले आहे ते आपल्याला जास्त व्याज आकरत आहेत. अश्या वेळी स्वस्त व्याजदराचा लाभ घेण्यासाठी आणि कर्ज दुसर्‍या बँकेत स्थानांतरित करण्यापूर्वी, बँकांच्या ऑफर बद्दल माहिती करून घ्या आणि सखोल संशोधन करा.

कर्ज हस्तांतरण:
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग तीन वेळा वाढ केल्यानंतर, बँकांचे कर्जे घेणे सर्वसामान्य माणसाला आता परवडेनासे झाले आहेत. कर्ज घेणे आता महाग झाले आहे. बँकांनी सर्व कर्जावरील व्याजदरात वाढ करून टाकली आहे. यामुळे तुमच्या गृहकर्ज आणि वाहन कर्ज यासह इतर कर्जाचा ईएमआय जबरदस्त प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही EMI चा हफ्ता कमी करण्यासाठी कर्ज हस्तांतरित करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही काही गोष्टी ची काळजी घेणे आवश्यक आहे. ही युक्ती फक्त योग्य बँक निवडण्यात मदत करेल असे नाही तर EMI कमी करण्यात देखील देखील मदत करेल.

व्याजदरांची तुलना करा :
स्वस्त व्याजदराचा लाभ घेण्यासाठी आणि कर्ज दुसर्‍या बँकेत ट्रान्स्फर करण्यापूर्वी, बँकांच्या व्याज संबंधित ऑफरचे सखोल संशोधन करा. बँकेच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही कोणती बँक किती दराने कर्ज देत आहे, याची सर्व माहिती मिळवू शकता. जर व्याजदरात थोडासा फरक असेल आणि तुमची फारच कमी बचत होत असेल, तर कर्ज शिफ्ट करण्यात काही फायदा नाही. थोडाफार फायदा होणार होणार असेल तर त्याचा उपयोग नाही कारण, कर्ज ट्रान्स्फर करण्यातच तुम्हाला प्रक्रिया शुल्क आणि इतर शुल्काचा खर्च जास्त येईल.

एकूण आउट-फ्लोची गणना करा :
कर्ज ट्रान्स्फर करण्यापूर्वी कर्जाच्या एकूण आउट-फ्लोची गणना करा. एकूण आउट-फ्लो म्हणजे जेव्हा तुम्ही कर्ज दुसर्‍या बँकेत हस्तांतरित करता, तेव्हा एकूण किती पेमेंट त्या बँकेत करावे लागेलं याची गणना करा. समजा तुम्ही एचडीएफसी बँककडून गृहकर्ज घेतले आहे. आता तुम्हाला काही बँका कमी व्याजावर कर्ज शिफ्ट करण्याची ऑफर देत आहे. यासोबतच कर्जाची मुदत वाढवण्याचाही पर्याय देदेत असतील तर अशा परिस्थितीत, तुम्ही कर्ज ट्रान्स्फर करण्यापूर्वी, पूर्ण काळात तुम्हला किती रक्कम भरावी लागेल हे तपासा. जर तुम्ही कर्ज हस्तांतरित केले तर एकूण किती रक्कम त्या बँकेत तुम्हाला भरावी लागेल, हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. असे केल्याने तुमचे किती पैसे बचत होतील हे तुम्हाला कळेल.

प्रक्रिया शुल्क आणि इतर शुल्क :
कर्ज हस्तांतरित करण्यापूर्वी त्यावरील प्रक्रिया शुल्क, मुद्रांक शुल्क, कायदेशीर शुल्क, मूल्यांकन शुल्क, तांत्रिक बाबींची माहिती घ्या. अनेक बँका फक्त प्रक्रिया शुल्क आकारतात आणि त्यामध्ये सर्व शुल्क एकत्र असतो. मात्र, काही बँका वेगवेगळे शुल्क आकारतात. काहीवेळा बँकांकडून फक्त थकीत रकमेवर प्रक्रिया शुल्क आकारला जातो.

आवश्यक कागदपत्र : कर्ज ट्रान्सफर करताना तुम्हाला काही कागदपत्रे गोळा करावे लागतील. यामध्ये तुमच्या ओळखीचा पुरावा, रहिवाशी पत्त्याचा पुरावा, वेतन स्लिप, फॉर्म नंबर 16 आणि मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट यांचा समावेश आहे. यासह, एक गोष्ट लक्षात ठेवा की सामान्यतः गृहकर्जाचे 12 ईएमआय भरल्यानंतरच तुम्ही शिल्लक गृहकर्ज दुसर्‍या बँकेत ट्रान्स्फर करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Loan transfer procedure to enjoy low interest rates on loan EMI on 13 August 2022.

हॅशटॅग्स

Loan transfer(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x