
Lohia Corp IPO | लोहिया कॉर्पोरेशन ही टेक्निकल टेक्सटाइल उत्पादनात वापरल्या जाणार्या मशीन्सची निर्मिती करणारी कंपनी आपला IPO लवकरच शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. कानपूरस्थित लोहिया कॉर्पोरेशन ह्या कंपनीने बाजार नियामक सेबीकडे IPO साठी कागदपत्र दाखल केले आहेत. मागील आठवड्यात दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस/DRHP मसुद्यानुसार हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल वर आधारित असेल. म्हणजेच ह्या IPO मध्ये कोणताही नवीन शेअर इश्यू केला जाणार नाही. OFS अंतर्गत प्रोमोटर्स आणि इतर भागधारक आपल्या गुंतवणुकीतून 31,695,000 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणतील.
IPO संबंधित सविस्तर तपशील :
लोहिया कॉर्प कंपनीला अपेक्षा आहे की, कंपनी जर शेअर बाजरी सूचीबद्ध झाली तर कंपनीची एक ब्रँड ओळख निर्माण होईल. ICICI सिक्युरिटीज, IIFL सिक्युरिटीज, HSBC सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझरी यांना या IPO इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या कंपनीचे इक्विटी शेअर्स BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध केले जातील. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल म्हणजेच पूर्णतः विक्रीसाठी खुला करण्यात येईल. कंपनीचे प्रमोटर्स आणि इतर गुंतवणुकदार आपल्या गुंतवणुकीतून 31,695,000 इक्विटी शेअर्स विकण्यासाठी शेअर बाजारात आणतील.
कंपनी बद्दल थोडक्यात :
लोहिया कॉर्प कंपनी कानपूरमध्ये असून ती टेक्निकल टेक्सटाइल कापडाच्या उत्पादनात वापरल्या जाणार्या यंत्रसामग्री आणि उपकरणाची निर्मिती करते. लोहिया कॉर्पने निर्माण केलेल्या मशिन्स आणि उपकरणांच्या माध्यमातून खास प्रकारचे पॉलीप्रॉपिलीन आणि हाय डेन्सिटी पॉलीथिलीन विणलेले कापड तसेच पोत्याचे उत्पादन केले जाते. 31 मार्च 2022 पर्यंत या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत जागतिक स्तरावर 90 पेक्षा जास्त देशांमधील 2,000 पेक्षा अधिक ग्राहकांचा समावेश होतो. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीचा एकूण महसूल 1,333.79 कोटी रुपये होता, त्यात वाढ होऊन आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने एकूण 2,237.48 कोटी रुपये महसूल कमावला आहे. तर कर कपातीनंतरचा एकूण नफा 160.85 कोटी रुपये वरून 119.30 कोटी रुपये झाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.