15 December 2024 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजमधून Jio फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी वेगळी होणार, RIL शेअर्स गुंतवणूकदारांना होणार फायदा

Jio Financial Share Price

Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची वित्तीय सेवा शाखा म्हणून ओळखली जाणारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे डिमर्जर होणार आहे. याचा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या दोन्ही स्टॉकवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते या डिमर्जरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी तिच्या शेअर धारकांसाठी महत्त्वपूर्ण मूल्य अनलॉक करु शकते. यामुळे शेअरच्या किमतीमध्ये 3-5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. (Reliance Industries Share Price)

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 2,825.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.15 टक्के वाढीसह 2,853.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा एक भाग आहे. 20 जुलै 2023 पासून हा स्टॉक निफ्टी 50 इंडेक्सवर सूचीबद्ध केला जाणार आहे. 20 जुलै 2023 रोजी एक विशेष प्री-ओपन सेशन आयोजित करून स्टॉक सूचीबद्ध केला जाईल. अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मने गुंतवणूकदारांना रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड तारखेपूर्वी म्हणजेच 20 जुलै 2023 पूर्वी खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 160 रुपये रुपये प्रति शेअर या किमतीवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने 8 जुलै 2023 रोजी सेबी फाइलिंगमध्ये कळवले की, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या डीमर्जरचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आणि त्यासाठी 20 जुलै 2023 हा दिवसा रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आला आहे.

रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आपले वित्तीय सेवा युनिट जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीमध्ये विलीन करणार आहे. रिलायन्स कंपनीच्या प्रत्येक शेअर धारकाला मूळ कंपनीच्या प्रत्येक शेअरच्या बदल्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा एक शेअर देण्यात येईल.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी आपल्या व्यापारी ग्राहक आणि खाजगी व्यवसायांना कर्ज वाटप करण्याचे काम करेल. नंतर ही कंपनी इन्शुरन्स पेमेंट, डिजिटल ब्रोकिंग आणि मालमत्ता व्यवस्थापन सेवा क्षेत्रात व्यवसाय विस्तार करेल. 21 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षाचे लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Share Price today on 19 July 2023.

हॅशटॅग्स

Jio Financial Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x