6 May 2024 12:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Vinayak Mete Passes Away | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण कार अपघातात शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचं निधन

Shivsangram Leader Vinayak Mete

Vinayak Mete Passes Away | शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचं भीषण कार अपघातात निधन झालं. विनायक मेटे यांची कार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटे साडेपाच वाजता दुर्घटनाग्रस्त झाली. यात विनायक मेटे यांच्यासह दोघे जखमी झाले होते. एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

मुंबईच्या दिशेने येतं असताना :
मिळालेल्या माहितीनुसार विनायक मेटे हे मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने येत होते. पुणे-मुंबई एक्स्प्रेसवरून कारमधून मुंबईच्या दिशेनं येत असतानाच पहाटे साडे पाच वाजता विनायक मेटे यांच्या कारचा माडप बोगद्यात भीषण अपघात झाला.

विनायक मेटे यांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण दुर्घटनेत विनायक मेटे हे गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकालाही जबर मार लागला. अपघातानंतर विनायक मेटे यांना तातडीने कामोठे (पनवेल) येथील एमजीएम (महात्मा गांधी मिशन) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विनायक मेटे यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. कार अपघातात विनायक मेटे यांच्या डोक्याला, मानेला आणि पायाला जबर मार लागला होता. उपचार सुरू असतानाच विनायक मेटे यांनी अखेरचा श्वास घेतला.

विनायक मेटेंना तासभर मदतच मिळाली नाही :
अपघात झाल्यानंतर विनायक मेटे यांना तासभर मदतच मिळाली नसल्याची माहिती समोर आलीये. विनायक मेटे यांच्या कारच्या चालकाने ही माहिती दिलीये. कारचा अपघात झाल्यानंतर मदतीसाठी गाड्या थांबवण्याचे प्रयत्न केले, पण कुणीही गाडी थांबवली नाही. एका छोट्या टेम्पो चालकाने आम्हाला मदत केली, असं चालक एकनाथ कदम यांनी सांगितलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsangram Leader Vinayak Mete passes away 14 August 2022.

हॅशटॅग्स

#VinayakMete(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x