8 May 2024 5:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

India 75th Independence Day | देशात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साह, पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

India 75th Independence Day

India 75th Independence Day | आज देशात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवव्यांदा ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर नरेंद्र मोदींनी संबोधनाला सुरुवात केली. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर लोक लढतील. भारत अंधकारयुगात जाईल, अशा अनेक कुशंका व्यक्त केल्या गेल्या. मात्र या देशाच्या मातीत सामर्थ्य आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

75 वर्षांचा कालखंड कितीही कठीण किंवा चांगला असला तरी पुढील 25 वर्षे देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे १३० कोटी देशवासीयांच्या स्वप्नांकडे मी पाहत आहे. येणाऱ्या 25 वर्षांसाठी पंचप्राणावर आपली शक्ती केंद्रित करावी लागेल. जेव्हा स्वातंत्र्याचे 100 वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत आपल्याला सर्व स्वप्नं पूर्ण करण्यासाठी काम करावं लागेल, असं आवाहनही मोदींनी केलं. यापुढील काळात भारताला विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करायची असेल, तर पंचप्राण ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला येऊन लाल किल्ल्यावरून भाषण करणारा मी पहिला पंतप्रधान आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांच्या प्रवासात देशाने अनेक चढउतार पाहिले. २०१४ मध्ये देशवासियांनी मला जबाबदारी दिली. देशातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करण्याचा महात्मा गांधींचा मंत्र मी जपला, असंही मोदी यावेळी म्हणाले.

राजकीय टिपणी सुद्धा :
‘क्रांतीवीरांनी ब्रिटिशांची झोप उडवली, ‘असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी देशाला महापुरुषांची पुन्हा एकदा आठवण करून दिली. यावेळी ‘भारताच्या कानाकोपऱ्यात त्या सर्व महापुरुषांचं स्मरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यांना एका कारणानं इतिहासात स्थान मिळाले नाही,’ असा उल्लेख करत पंतप्रधानांनी काँग्रेसला टोलाही लगावला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: India 75th Independence Day LIVE from Red Fort check details 15 August 2022.

हॅशटॅग्स

#India 75th Independence Day(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x