11 December 2024 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL
x

मध्य प्रदेशात मायावतींचं काँग्रेसला समर्थन

भोपाळ : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची अंतिम आकडेवारी जाहीर झाली असून मतदारांनी काँग्रेस आणि भाजप अशा कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत दिलेलं नाही. एकूण २३० जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला ११४ जागांवर विजय मिळाला असला तरी बहुमताचा एकदा ११६ आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाला १०९ जागांवर विजय प्राप्त झाला आहे. तर दुसरीकडे सपा १, बसपा २ आणि अपक्ष उमेदवारांचा एकूण ४ जागांवर विजय झाला आहे.

सत्तास्थापनेसाठी मायावतींच्या बसपाने काँग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा मध्यप्रदेशात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात सपाने सुद्धा काँग्रेसला समर्थन दिलं आहे.

विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरुन छत्तीसगड, राजस्थान आणि एमपी’मध्ये सामान्य जनता भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या धोरणांविरोधात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. इतर कोणताही दुसरा सक्षम पर्याय नसल्याने सामान्यांनी काँग्रेसला निवडलं आहे’, असं मायावती पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x