 
						Mutual Fund Schemes | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच म्युचुअल फंड SIP आजकाल गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय आहे. मागील काही वर्षांत, म्युच्युअल फंडात एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जबरदस्त वाढली आहे. तुम्ही SIP मध्ये फक्त 500 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता. या म्युचुअल फंडांनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूक जबरदस्त प्रमाणात वाढली आहे.
SIP कॅल्क्युलेटर :
म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम भरावी लागत नाही, तुम्ही फक्त छोट्या प्रमाणात पैसे गुंतवणूक करून म्युचुअल फंड मधून जबरदस्त परतावा कमवू शकता. यामुळे तुमच्या खिशावर कोणताही भार पडत नाही आणि तुम्ही दीर्घकाळात पैसे बचत करून एक चांगला फंड तयार करू शकता.
SIP ने दिला बंपर परतावा :
जर तुम्ही नेहमी गुंतवणुकीचा विचार करत असाल परंतु अद्याप म्युचुअल फंड गुंतवणूक सुरू केली नसेल, तर आम्ही तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करणारे काही SIP म्युच्युअल फंड बद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही त्यात गुंतवणूक करू शकता आणि दीर्घकाळात जबरदस्त परतावा मिळवू शकता. या SIP ने मागील तीन वर्षात जॅकपॉट परतावा कमावला आहे.
ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड :
ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदाराना 42.1 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 6,887 कोटी रुपये आहे. आणि निव्वळ मालमत्ता मूल्य 163 कोटी रुपये आहे. रिसर्च फर्म क्रिसिलने या म्युचुअल फंडाला 3 स्टार रेटिंग दिली आहे. इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड हे या म्युचुअल फंड मधील टॉप 5 होल्डिंग्स आहेत.
टाटा डिजिटल इंडिया फंड :
टाटा डिजिटल इंडिया फंडाने मागील तीन वर्षांत 39.4 टक्के परतावा कमावला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 3842 कोटी रुपये असून निव्वळ मालमत्ता मूल्य 38.2 कोटी रुपये आहे. या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 2.02 टक्के आहे. यामध्ये तुम्ही फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड या म्युचुअल फंडाच्या टॉप होल्डिंग्स आहेत.
आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंड :
आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंडाने मागील तीन वर्षांत 40.5 टक्के परतावा कमावला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 2658 कोटी रुपये असून निव्वळ मालमत्ता मूल्य 140 कोटी रुपये आहे. या म्युचुअल फंडाचे निधी खर्चाचे प्रमाण 2.19 टक्के आहे. यामध्ये तुम्ही फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड या म्युचुअल फंडाच्या टॉप होल्डिंग्स आहेत.
SBI तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड :
एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना मागील तीन वर्षांत 36.6 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 1891 कोटी रुपये असून आणि निव्वळ मालमत्ता मूल्य 156 कोटी रुपये आहे. तुम्ही या म्युचुअल फंडात 500 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या फंडाचे खर्चाचे प्रमाण 2.27 टक्के आहे. इन्फोसिस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अल्फाबेट इंक., टेक महिंद्रा लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड हे या म्युचुअल फंडाचे टॉप होल्डिंग आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		