21 May 2024 8:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Nippon Mutual Fund | जबरदस्त म्युचुअल फंड योजना, फक्त 50,000 रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी रुपयांचा मल्टिबॅगेर परतावा

Nippon india mutual fund

Nippon Mutual Fund | म्युच्युअल फंड कंपन्यांच्या एकापेक्षा एक जबरदस्त योजना असतात. या म्युच्युअल फंड योजनांपैकी एक अशी योजना आहे, ज्यात फक्त 50,000 रुपयांची गुंतवणूक थेट एकरकमी गुंतवणूक तुम्हाला देईल 1 कोटी रुपयांपर्यंत परतावा. एवढेच नाही तर ही म्युच्युअल फंड योजन सध्याही खूप जबरदस्त परतावा देत आहे. दुसरीकडे, जर तुम्ही या म्युच्युअल फंड योजनेत दर महिन्याला फक्त 1000 रुपयांची SIP गुंतवणूक सुरू केली, तर तुम्हाला त्यावर 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळेल. म्हणजेच, या म्युच्युअल फंड योजनेचा गुंतवणूकदारांना प्रत्येक प्रकारे खूप जबरदस्त फायदा होताना दिसत आहे. तुम्हाला या म्युच्युअल फंड योजनेबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही या लेखात तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत.

प्रथम म्युच्युअल फंड SIP बद्दल जाणून घेऊ. म्युच्युअल फंडातील पद्धतशीर गुंतवणूक योजनेला थोडक्यात “एसआयपी” म्हणतात. ही एक मासिक गुंतवणूक पद्धत आहे. SIP बँक आणि पोस्ट ऑफिसच्या आरडीसारखे असते. पण त्यात आणखी अनेक जबरदस्त वैशिष्ट्ये देखील आहेत. यामध्ये तुम्हाला गुंतवणूक वाढवता किंवा कमी करता येते. याशिवाय SIP द्वारे गुंतवणुकीत इतरही अनेक फायदे उपलब्ध आहेत. आता या योजनेबद्दल जाणून घेऊ.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड : Nippon India Growth Fund :
आपण ज्या म्युचुअल फंड बद्दल चर्चा करत आहोत त्या म्युच्युअल फंड योजनेचे नाव निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड आहे. या योजनेने मागील काळात खूप चांगला परतावा दिला आहे. जर तुम्ही या म्युच्युअल फंड योजनेत एका वेळी एकरकमी 50,000 रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असते. दुसरीकडे, निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडामध्ये महिन्याला 1000 रुपयांची एसआयपी केली असती तर आता तुमची गुंतवणूक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती. या योजनेमुळे दोन्ही मार्गांनी तुम्ही करोडपती झाला असता.

50,000 रुपयांची गुंतवणूक 1 कोटी रुपये कशी झाली :
प्रथम 50,000 रुपयांची गुंतवणूक 1 कोटी रुपये कशी झाली हे जाणून घेऊ. निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड योजना 8 ऑक्टोबर 1995 रोजी सुरू झाली होती. हा फंड सुरू करताना ज्याने 50000 रुपये गुंतवले होते, त्याला सध्या 10643822 रुपये परतावा मिळाला आहे. म्हणजे आजच्या घडीला १ कोटी रुपयांहून अधिक परतावा. निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने लाँच झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 21187.64 टक्के परतावा दिला आहे. दुसरीकडे पाहिल्यास, हा परतावा दर वार्षिक सरासरी 22.61 टक्के एवढा आहे. या योजनेत गुंतवणूकदाराला 50,000 रुपये फक्त एकदाच एकरकमी गुंतवावे लागतात.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडचा वर्षभराचा परतावा जाणून घ्या :
* निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने मागील 1 वर्षात तब्बल 47.44 टक्के परतावा दिला आहे.
* निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने मागील 2 वर्षात एकूण 77.07 टक्के परतावा दिला असून CAGR म्हणजेच दरवर्षी मिळणारा सरासरी परतावा 32.96 टक्के आहे.
* निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने मागील 3 वर्षांमध्ये एकूण 99.89 टक्के परतावा दिला असून CAGR म्हणजेच प्रति वर्ष सरासरी परतावा 25.94 टक्के आहे.
* निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने मागील 5 वर्षांमध्ये एकूण 139.68 टक्के परतावा दिला असून CAGR म्हणजेच दरवर्षी मिळणारा सरासरी परतावा 19.09 टक्के आहे.
* निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने मागील 10 वर्षांमध्ये एकूण 443.55 टक्के परतावा दिला असून CAGR म्हणजेच प्रति वर्ष सरासरी परतावा 18.43 टक्के आहे. * निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने लाँच झाल्यापासून आजपर्यंत एकूण 21187.64 टक्के परतावा दिला असून सीएजीआर म्हणजेच दरवर्षी मिळणारा सरासरी परतावा 22.61 टक्के आहे.

1000 रुपये ने SIP करून करोडपती कसे व्हाल? निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांनाही जबरदस्त परतावा दिला आहे. 8 ऑक्टोबर 1995 ला निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड लॉन्च झाल्यावर ज्याने या फंडात महिन्याला 1000 रुपयांची एसआयपी गुंतवणूक सुरू केली आहे, त्याचे गुंतवणूक मूल्य आता 13424782.55 रुपये म्हणजेच 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. या दरम्यान, गुंतवणूकदाराने एकूण 315000 रुपये SIP द्वारे गुंतवलेले असतील. या SIP गुंतवणुकीने एकूण 4161.84 टक्के परतावा मिळवून दिला आहे. जर आपण सरासरी वार्षिक परतावा पाहिला तो 23.08 टक्के राहिला आहे.

SIP द्वारे मिळणारा वार्षिक परतावा जाणून घ्या :
* निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने एसआयपी मोडद्वारे सातत्याने जबरदस्त परतावा दिला आहे.
* निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडचा 1 वर्षात SIP द्वारे एकूण परतावा 21.13 टक्के असून CAGR म्हणजेच सरासरी वार्षिक परतावा 41.1 टक्के आहे.
* फंडचा मागील 2 वर्षांत SIP द्वारे एकूण परतावा 58.51 टक्के असून CAGR म्हणजेच सरासरी वार्षिक परतावा 51.34 टक्के राहिला आहे.
* मागील 3 वर्षांत SIP द्वारे एकूण परतावा 71.23 टक्के मिळाला असून CAGR म्हणजेच सरासरी वार्षिक परतावा 38.15 टक्के राहिला आहे.
* मागील 5 वर्षांत SIP द्वारे एकूण मिळणारा परतावा 83.29 टक्के राहिला असून CAGR म्हणजेच सरासरी वार्षिक परतावा 24.45 टक्के राहिला आहे.
* मागील 10 वर्षांत SIP द्वारे मिळणारा एकूण परतावा 175.89 टक्के राहिला असून CAGR म्हणजेच सरासरी वार्षिक परतावा 19.26 टक्के मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nippon Mutual Fund investments for long term returns on 20 August 2022.

हॅशटॅग्स

Nippon india mutual fund(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x