6 May 2024 3:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Multibagger Penny Stocks | या शेअरने 15 महिन्यांत 1000 टक्के परतावा, तर मागील सलग 5 दिवस स्टॉक अप्पर सर्किटमध्ये, स्टॉकबद्दल जाणून घ्या

Multibagger Penny stocks

Multibagger Penny Stocks | चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे जबरदस्त निकाल जाहीर आल्यानंतर ब्राइटकॉम समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मागील पाच दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये सतत अपर सर्किट लागत आहे.

मागील महिनाभरात शेअर बाजारातील अनेक कंपन्यांचे शेअर्सने जबरदस्त प्रदर्शन केले आहेत.शेअर बाजारातील या तेजीचे प्रमुख कारण म्हणजे पहिल्या तिमाहीत कंपन्यांनी धमाकेदार कामगिरी केली आहे. ब्राइटकॉम ग्रुप ही अशीच एक कंपनी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जरी केल्यानंतर ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर सुसाट पळत सुटले आहेत. मागील पाच दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये सतत अपर सर्किट लागत आहे. मागील 15 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या भागधारकांना तब्बल 1500 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

मागील 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये जोरदार कामगिरी :
गुंतवणूकदारांसाठी मागील 5 ट्रेडिंग सेशम जबरदस्त परतावा देणारी ठरली आहेत. या काळात ब्राइटकॉम समूहाच्या शेअर्समध्ये 21 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 16 ऑगस्ट 2022 पासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किटला स्पर्श करत आहेत. मागील काही काळात या कंपनीची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. पण गेल्या 6 महिन्यांमध्ये ब्राइटकॉम समूहाच्या शेअरची किंमत तब्बल 45 टक्क्यांनी घसरली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे ज्या कंपन्यांच्या भागधारकांना जाबरदस्त नुकसानीला सामोरे जावे लागले आहे, हा स्टॉक त्यापैकीच एक आहे. या चालू वर्षात आतापर्यंत कंपनीचा शेअर 55 टक्क्यांनी खाली पडला आहे. वर्षाच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर 102.75 रुपये वर ट्रेड करत होता. जो आज सध्या NSE मध्ये 46.50 रुपयांपर्यंत पडलेला दिसेल.

दीर्घकालीन गुंतवणूकदार मालामाल :
जरी हे वर्ष कंपनीच्या गुंतवणूकदार आणि भागधारकांसाठी चांगले नसले तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कंपनीने मालामाल केले आहे. कंपनीच्या एका वर्षाच्या कामगिरीवर नजर टाकली, या काळात ब्राइटकॉम समूहाच्या शेअर्सच्या किमतीमध्ये 165 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. शेअरची किंमत 17.58 रुपयांवर ट्रेड करत होती ती आता 46.50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मागील 15 महिन्यांतील शेअर्सची कामगिरी पहिली तर, या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 46.50 रुपयांवर पडली आहे. म्हणजेच मागील.15 महिन्यांत या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 1000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावला आहे. ज्या गुंतवणूकदाराने हा स्टॉक दोन वर्षांपूर्वी विकत घेतला होता, त्याला सध्या 1200 टक्के परतावा मिळाला असेल.

या कंपनीचे बाजार भांडवल तब्बल 9383 कोटी रुपये आहे. NSE वर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 122.83 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 16.71 रुपये आहे. 15 ऑगस्ट रोजी कंपनीने निकाल जाहीर केला होता. या निकालांनुसार , ह्या डिजिटल मार्केटिंग कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत चली वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 126.28 टक्के अधिक पैसा कमावला आहे. तर कंपनीचा नफा तब्बल 162.66 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Penny Stocks Brightcom Company share return on 23 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Penny Stocks(98)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x