24 April 2024 8:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

केंद्रीय निवडणूक आयोगही सुनावणी घेऊ शकणार नाही | 25 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष

Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis | शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत युती केली त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणीही गुरुवारी होणार आहे.

आज शिवसेनेनं याबद्दल सरन्यायाधीशांकडे विनंती केली. त्यामुळे अखेरीस सुनावणी घेण्यात आली. सरन्यायाधीश एनव्ही रमन्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायाधीशांनी शिवसेनेची बाजू ऐकूण घेतली आहे. हे प्रकरण आता 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणीही गुरुवारी म्हणजे 2 दिवसांनी होणार आहे म्हणजे २५ ऑगस्टला घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. तसंच, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निवडणुकापूर्वी प्रतिकात्मक मुद्यावर न्यायालयाची तोपर्यंत स्थगित दिली आहे.

निवडणूक आयोगाला सुद्धा हे आदेश :
शिंदे गटाने शिवसेनेना आमचीच असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर केला आहे. मूळ शिवसेनेकडूनही निवडणूक आयोगाने प्रतिदावा करणारे पुरावे मागितलेले आहेत. दोन्ही गटांची कागदपत्र निवडणूक आयोगाकडे आलेली असून कोणत्याही क्षणी शिवसेना पक्षाविषयीचा अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशापूर्वी निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, अशा सूचना खंडपीठाने आज दिल्या. 25 ऑगस्ट रोजी या प्रकरणी सुनावणी होईल, तेव्हा सुरुवातीला निवडणुक आयोगासंदर्भातील निर्णय प्राधान्याने घेतला जाईल, असेही कोर्टाने स्पष्ट केले.

घटनापीठाकडे कोणत्या मुद्यावर सुनावणी :
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टात एकनाश आणि शिवसेना यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. घटनापीठासमोर काही मुद्यांवर सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

* कोणत्या मुद्यावर घटनापीठ निर्णय घेणार?
* विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव प्रलंबित असताना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी करू शकतात का?
* या दरम्यान सभागृहाचे कामकाज कसे सुरू राहिल?
* राजकीय पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि त्यात निवडणूक आयोगाची भूमिका या मुद्यांवर घटनापीठ सुनावणी करणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Political Crisis in Supreme Court of India check details 23 August 2022.

हॅशटॅग्स

#Maharashtra Political Crisis(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x