14 September 2024 8:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News Smart Investment | लेकीसाठी गुंतवा फक्त रु.10,000; परतावा रक्कम मिळेल 55.61 लाख रुपये, आजच फॉर्म भरा - Marathi News
x

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आदित्य चोप्रांचा जबाब नोंदवला

Police Statement, Aditya Chopra, Yash Raj Films, Sushant Singh Rajput

मुंबई, 18 जुलै: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सध्या त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. परंतु अद्यापही त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येबाबतीत आतापर्यंत ३५ जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता वांद्रे पोलिसांनी दिग्दर्शक आदित्य चोप्रांचा जबाब नोंदवला आहे. तब्बल चार तासांच्या या प्रक्रियेनंतर ते पोलीस स्थानकाबाहेर आले.

या चौकशी दरम्यान पोलिसांनी आदित्य चोप्रांकडे ‘पानी’ चित्रपट आणि सुशांतमध्ये झालेल्या यशराज फिल्म करारासंबंधित विचारणा केली. सध्या बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद तुफान रंगत आहे. १४ जुलै रोजी त्याने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर सगळं बॉलिवूड हळहळलं. मात्र या प्रकरणात दोन आरोप होऊ लागले. काही कलाकारांनी मात्र सुशांत सिंह हा घराणेशाही, गटबाजीचा बळी आहे असा आरोप झाला. कंगना रणौतने या प्रकरणी सर्वात आधी आरोप केला आहे. मानसिक लिंचिंगमुळे सुशांतचा बळी गेला अशी भूमिका कंगनाने घेतली आहे. त्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्राच्या गृहखात्यानेही लक्ष घातलं. मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणात ३० पेक्षा जास्त जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

 

News English Summary: Mumbai Police has now recorded Yashraj’s reply to Aditya Chopra in connection with the suicide of actor Sushant Singh Rajput. Mumbai Police has asked Aditya Chopra some questions in this regard. Mumbai Police has tweeted the information in this regard.

News English Title: The Statement Of Aditya Chopra Of Yash Raj Films Recorded In Sushant Singh Rajput Death Case News Latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x