5 May 2024 10:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येण्याची स्वप्नं पडणं हा आजार आहे - संजय राऊत

MP Sanjay Raut

मुंबई, १८ जुलै | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदशाध्यक्षा शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा चर्चांनी जोरही धरला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीच खुलासा केला आहे. अशी स्वप्नं पडणं हा आजार आहे. असे काही होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष चालेल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. त्याविषयी मी त्यांच्याशी संवाद साधला. पण तुम्हाला वाटतं तसे राजकारण यात नाही, असं राऊत म्हणाले.

दुसरीकडे एनसीपीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पवारांच्या आशीर्वादाने सरकार चालू असल्याचं विधान केलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार हे वयाने, अनुभवाने मोठे नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद सरकारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ते मान्य केलं आहे. अमोल कोल्हे राणा भीमदेवी थाटात बोलले असतील. पण हे तीन पक्षांचे सरकार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP Shivsena and NCP will never come together in Maharashtra said MP Sanjay Raut news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x