10 May 2024 9:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Investment Scheme | या योजनेत फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक करून मिळवा वार्षिक 5.8 टक्के व्याज आणि 16 लाख रुपयांचा परतावा

Investment scheme

Investment scheme| इंडिया पोस्टने आवर्ती ठेव योजनेमध्ये फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक करण्याची मुभा दिली आहे. ज्यामध्ये तुम्हाला परतावा म्हणून जबरदस्त रक्कम परत मिळेल. तसेच, तुम्ही आरडी खात्यात काही पैसे जमा करून त्यावर मिळणारा व्याज जोडून जोरदार परतावा मिळवू शकता.

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना :
भारतीय पोस्ट ऑफिस भारतातील सर्वोत्तम मासिक योजना राबवते. यावेळी पोस्ट विभाग तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम यालाच आपण आरडी योजना असेही म्हणतात. या योजनेमध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला जबरदस्त फायदा होईल. पोस्ट ऑफिस विभाग हा सरकारी विभाग असल्याने त्यात गुंतवलेले तुमचे पैसे बुडण्याचा धोका अजिबात नसतो. तसेच, तुम्ही आरडी खात्यात काही पैसे जमा करून त्यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळवू शकता.

गुंतवणूक काळ :
आरडी खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतीही कमाल काळमर्यादा नाही. तुम्ही हे आवर्ती ठेव खाते तुमच्या सोयीनुसार 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्ष कालावधीसाठी उघडू शकता. त्यात जमा केलेल्या पैशावर तुम्हाला प्रत्येक तिमाहीमध्ये व्याज परतावा दिला जाईल. तसेच, मिळणारा व्याज परतावा प्रत्येक तिमाहीच्या शेवटी, तुमच्या आरडी खात्यात चक्रवाढ पद्धतीने जोडले जाईल.

वय मर्यादा :
पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणही व्यक्ती आपले खाते उघडून पैसे जमा करू शकते. या योजनेत दोन किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येऊन संयुक्त खाते देखील उघडता येते. तसेच, पालक आपल्या अल्पवयीन मुलाचे खाते उघडून त्याचे व्यवस्थापन करू शकतात. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बालकाच्या नावानेही खाते उघडता येते.

गुंतवणूक परतावा : 
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये दर महिन्याला 10000 रुपये जमा केले तर त्यावर तुम्हाला वार्षिक 5.8 टक्के दराने व्याज परतावा मिळेल, तुम्हाला 10 वर्षांची मुदत पूर्ण झाली की 16,28,963 रुपये परतावा म्हणून परत मिळतील.

कर्ज सुविधा देखील उपलब्ध :
पोस्ट ऑफिसच्या या आरडी योजनेमध्ये तुम्हाला बँकेकडून कर्ज उचलण्याची ही सुविधा दिली जाते. या योजनेत तुम्ही किमान 12 हप्ते जमा केल्यानंतर तुम्ही कोणत्याही बँकमधून कर्ज घेण्यास पात्र ठरू शकता. खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्के रक्कम कर्ज म्हणून घेण्यास परवानगी आहे. घेतलेल्या कर्जावर आरडीवरील व्याजापेक्षा २ टक्के अधिक व्याज भरावे लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Investment scheme of Recurring deposit in post office for huge return on 23 August 2022

हॅशटॅग्स

#Investment Scheme(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x