7 May 2024 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली ICICI Mutual Fund | पैसे गुंतवा आणि हमखास दुप्पट परतावा घ्या, ही म्युच्युअल फंड योजना आहे खास फायद्याची Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार?
x

Shakti Pump Share Price | मल्टिबॅगर शेअर तेजीत येणार, स्टॉक अप्पर सर्किटवर आदळला, कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली

Shakti Pump Share Price

Shakti Pump Share Price | शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीला पंप पुरवठा करण्याची 73 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. शक्ती पंप्स कंपनीला हरियाणा अक्षय ऊर्जा विभागाने 73 कोटी रुपये मूल्याची पंप पुरवठा करण्याची ऑर्डर दिली आहे. ( शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश )

शक्ती पंप्स इंडिया कंपनीला KUSUM-3 योजने अंतर्गत हरियाणा रिन्युएबल एनर्जी विभागाने चौथी वर्क ऑर्डर दिली आहे. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी शक्ती पंप्स इंडिया कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 1,218.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शक्ती पंप्स कंपनीचे शेअर्स 1162.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शक्ती पंप्स कंपनीला हरियाणा अक्षय ऊर्जा विभागाने सौर जल पंपिंग प्रणालीसाठी 2130 पंप पुरवठा करण्याचे काम दिले आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 120 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 73.32 कोटी रुपये आहे. शक्ती पंप्स कंपनीने या वर्षी जानेवारी 2024 मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन प्लेसमेंटद्वारे 200 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे.

मागील एका वर्षात शक्ती पंप्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना शेअर्स 180 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 मार्च 2023 रोजी शक्ती पंप कंपनीचे शेअर्स 415.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1162.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 6 महिन्यांत शक्ती पंप्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 47 टक्क्यांनी वाढली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 787.15 रुपयेवरून वाढून 1162.45 रुपये किमतीवर पोहचले आहेत. शक्ती पंप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1599.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 388.70 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shakti Pump Share Price NSE Live 14 March 2024.

हॅशटॅग्स

Shakti Pump Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x