7 May 2024 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

PPF Scheme | छोट्या गुंतवणुकीतून मोठा नफा, या सरकारी योजनेतील सुरक्षित गुंतवणुकीतून हमखास मिळेल मजबूत परतावा

PPF Scheme

PPF Scheme | या सरकारी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सध्या 7.1.टक्के या व्याज दराने परतावा दिला जात आहे. या योजनेत तुम्हाला प्रत्येक तिमाहीत व्याज परतावा दिले जाते.

पीपीएफ गुंतवणूक:
तुम्हाला तुमच्या आनंदी भविष्यासाठी आर्थिक नियोजन करायचे असेल, तर तुमच्याकडे एक जबरदस्त संधी आहे PPF मध्ये गुंतवणूक करण्याची. अशा परिस्थितीत गुंतवणुकीचे नियोजन वेळेत केले तर तुम्हाला अतिशय चांगला परतावा मिळू शकतो. आम्ही तुम्हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल माहिती देणार आहोत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही जबरदस्त नफा कमवू शकता. आपण या लेखात पीपीएफ गुंतवणुकीबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. या योजनेत तुमचा पैसा सुरक्षित राहील, आणि सोबत तुम्हाला जबरदस्त परतावाही मिळवून देईल. या सरकारी योजनेत गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात जबरदस्त नफा कमवू शकता आणि एक चांगला फंड तयार करू शकता. या योजनेत छोटी गुंतवणुक करून तुम्ही मोठी कमाई कशी करू शकता.

500 रुपयांपासून गुंतवणूक :
तुम्ही PPF मध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या खात्यामध्ये तुम्ही वार्षिक कमाल 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह आणि 12500 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीसह सुरुवात करू शकता. PPF योजनेत मुदत पूर्ती कालावधी 15 वर्षे आहे आणि तुम्ही हा कालावधी पुढील 5-5 वर्षे वाढवू शकता.

या योजनेत मिळणारा परतावा :
केंद्र सरकारच्या या गुंतवणूक योजनेत सध्या गुंतवणूकदारांना 7.1 टक्के दराने व्याज परतावा दिला जातो. या योजनेत प्रत्येक तिमाहीत व्याज दिला जातो. तुम्ही तुमच्या नावाने किंवा अल्पवयीन व्यक्तीचे पालक म्हणून पीपीएफ खाते उघडून गुंतवणूक करू शकता.

या योजनेत गुंतवणूक करून करोडपती कसे व्हावे :
जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करून करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला या योजनेत किमान 25 वर्षे नियमित गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही पुढील 25 वर्ष 1.5 लाख रुपयांची वार्षिक गुंतवणुक करत असाल तर तुमचे एकूण 37,50,000 रुपये जमा होतील. यावर तुम्हाला 65,58,012 रुपये वार्षिक 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याज दिले जाईल आणि मुदत पूर्ण झालेली तुम्हाला एकूण 1,03,08,012 रुपये परतावा मिळेल.

कर सवलत :
जर तुम्हाला या PPF योजनेत गुंतवणूक केल्यावर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ दिला जाईल.आयकर कलम 80C अंतर्गत तुम्हाला मिळणाऱ्या परतव्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही. या योजनेत गुंतवणूक करणे सुरक्षित तर आहेच, शिवाय येथे तुम्ही गुंतवणुकीवर चांगला वार्षिक परतावा देखील कमावू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Scheme long term investment benefits on 24 August 2022.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x