31 May 2024 6:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 31 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या LIC Share Price | कमाईची मोठी संधी! LIC स्टॉक अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा, ब्रोकरेजचा रिपोर्ट NBCC Share Price | सरकारी शेअर खिसा पैशाने भरतोय, 6 महिन्यात पैसे दुप्पट, खरेदी करा PSU स्टॉक IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! कंपनी प्रचंड चर्चेत, स्वस्त शेअर खरेदी करणार? Salary EPF Money | नोकरदारांनो! तुमच्या पगारातून EPF कापला जातोय? झटपट पैसे मिळतील, अपडेट जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

Shreeji Share Price | श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स IPO मध्ये गुंतवलेले 1.30 लाख रुपये 6 वर्षांत 10.30 लाख रुपये झाले, फ्री बोनस शेअर्सची कमाल

Shreeji Share Price

Shreeji Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर, तुम्ही श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपनीने नुकताच आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.

श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स या कंपनीचा आयपीओ 2017 साली शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 130 रुपये जाहीर केली होती आणि एका लॉटमध्ये कंपनीने 1000 शेअर्स जारी केले होते. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदाराला किमान 1.30 लाख रुपये जमा करावे लागले होते. आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.93 टक्के घसरणीसह 67.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस शेअर वाटप करण्यात या कंपनीचा इतिहास सकारात्मक आहे. यापूर्वी श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक्स कंपनीने शेअर धारकांना दोन वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत वाटप केला होता.

IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 1000 शेअर्सचा शेअरचा एक लॉट मिळाला होता. त्यात बोनस शेअर्स जोडून शेअरची एकूण सख्या 2000 झाली. आणि कंपनीने पुन्हा एकदा 2 शेअरवर एक बोनस शेअर्स मोफत वाटप केला होता. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या शेअरची एकूण संख्या 3000 झाली.

2023 मध्ये फेब्रुवारी महिन्यात श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक कंपनीने आपले शेअर्स 5 तुकड्यामध्ये विभाजित केले होते. आणि या स्टॉक स्प्लिटनंतर गुंतवणूकदारांच्या एकूण शेअरची एकूण संख्या 15,000 हजार झाली. IPO किमतीच्या तुलनेत शेअरची सख्या 8 पट अधिक वाढली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये श्रीजी ट्रान्सलॉजिस्टिक स्टॉक 68.70 रुपये किमतीवर पोहचला होता. अशा प्रकारे 6 वर्षांपूर्वी IPO मध्ये गुंतवणूक करून स्टॉक होल्ड करणाऱ्या गुंतवणूकदारांचे 1.30 लाख रुपये आता 10.30 लाख रुपये झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shreeji Share Price today on 11 August 2023.

हॅशटॅग्स

Shreeji Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x