29 April 2024 1:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

एनआयएच्या अटकेतील वाझे आणि प्रदीप शर्मा जुने मित्र | प्रदीप शर्माच्या सेनेतील प्रवेशात शिंदेंचा पुढाकार, शिंदे समर्थकांचे अज्ञान?

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | आज सत्ताधाऱ्यांकडूनच विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या 50 खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना सचिन वाझेंचे खोक मातोश्री ओके अशी टीका करत अँटिलिया व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडकलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणी ठाकरे घराण्यावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जे पोस्टर धरुन जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती, त्या पोस्टरवर आदित्य ठाकरेंचा फोटो लावल्याने आदित्य ठाकरेंनाही डिवचण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांकडून देण्यात असलेल्या घोषणेबाजीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष दिसून येत आहे.

सचिन वाझे प्रकरणी जोरदार घोषणाबाजी :
सचिन वाझे प्रकरणी महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले होते, त्यामुळे आता शिंदे गटातील आमदारांनी वाझे प्रकरणावरून ठाकरे घराण्याला निशाणा करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळी झालेले घोटोळ्यांवर सत्ताधाऱ्यांनी टीका करत मातोश्रीवर टीका केली आहे.

वास्तव काय :
वास्तविक २०१९ मधील निवडणुकीपूर्वी वसई ते पालघरपर्यंत आमदार हितेंद्र ठाकूर आणि भाई ठाकूर यांच्या साम्राजाला धक्का देऊन येथील राजकारण स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच प्रदीप शर्मा यांचा शिवसेना प्रवेश घडवून आणला होता. एकनाथ शिंदे यांचे सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासोबत जवळचे संबंध होते हे सर्वश्रुत आहे. त्यासाठी प्रदीप शर्मा यांना क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात तिकीट मिळवून देण्यात देखील एकनाथ शिंदे यांचा थेट संबंध होता हे सर्व शिवसैनिकांना माहिती आहे. त्यामुळे खोके नेमके कोणाकडे जात होते याची चर्चा शिवसैनिकांमध्ये पुन्हा सुरु झाली आहे आणि केंद्रस्थानी आहेत एकनाथ शिंदे.

प्रदीप शर्मा आणि सचिन जोशी :
उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा सध्या एनआयएच्या ताब्यात असून त्यांच्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. तसेच शिंदे गट शिवसेनेतून फुटताच अनेक वर्तमानपत्रांनी एकनाथ शिंदेंचे खासगी सचिव सचिन जोशी यांच्या विषयी वृत्त प्रसिद्ध करताना एनआयए उल्लेख केला होता. त्यामुळे अनेक तर्कवितर्क पत्रकारांमध्ये सुरु झाले होते.

Eknath-Shinde-Sachin-Joshi

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Supporter MLA allegations against Matoshri check details 25 August 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x