राळेगणसिद्धी : जनलोकपाल, लोकायुक्त, शेतक-यांचे प्रश्न या अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात सलग ५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा ७वा दिवस असून त्यांच्या वयाचा विचार करता, त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले.

दरम्यान, काल गिरीश महाजन यांच्यासोबतची अण्णांची बैठक निष्फळ ठरली आहे. तसेच अण्णांनी आता पद्म पुरस्कार सुद्धा भारत सरकारला परत करण्याचा इशारा दिला आहे. अण्णांच्या वयाचा विचार करता त्यांचे घटत जाणारे वजन त्यांच्या प्रकृतीसाठी चांगलं नाही, असा डॉक्टरांनी आधीच स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः राळेगणसिद्धीत अण्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करणार आहेत. त्यामुळे सरकारकडून पुढे काय हालचाली होणार ते पाहावं लागणार आहे.

mns chief raj thackeray will meet anna hajare at ralegansidhi