ग्राम परिवर्तन; यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल, कार्यक्षम जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांची कामगिरी: सविस्तर

यवतमाळ : ग्रामीण भागात विकास साध्य करायचा म्हटलं की आधी तिथल्या सामान्य लोकांप्रती प्रामाणिक आस्था आणि तिथे भेडसावणाऱ्या मूळ समस्यांचा अभ्यास करणे सुद्धा तितकेच गरजेचे असते. परंतु, लोकाभिमुख विकास साधायचा म्हटल्यावर विषय जिल्ह्यातील प्रशासकीय सेवेवर येऊन थांबतो, असा साहजिकच विचार प्रत्येकाच्या मनात येतो. मात्र, देशभरात मोजकेच प्रामाणिक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत जे प्रशासनातील अधिकारांचा अभ्यासपूर्ण वापर करतात आणि ग्रामीण भागातील लोकाभिमुख विकास तसेच विविध योजना सत्यात उतरवताना दिसतात. त्यातीलच एक नाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ज्यांच्यामुळे ग्राम परिवर्तनात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी इथल्या विविध समस्यांचा अभ्यास केला होता. तसेच पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी शेतकरी आत्महत्या, पीककर्ज, कर्जमाफी आणि पाणीटंचाई सारख्या गंभीर विषयांवर स्वतंत्र बैठका आयोजित करून स्थानिक नागरिकांना कसा दिलासा देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं. दरम्यान, राज्य सरकारच्या ५ महत्वाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याला राज्यात अव्वल क्रमवारीत पोहोचवले. पाण्याची समस्या भीषण असल्याने त्यासंबंधित विषयांवर गंभीरपणे लक्ष केंद्रित आणि काही शिस्तबद्ध नियोजनातून पाण्याची पातळी ७ मित्राने वाढवण्यात यश मिळवलं.
दरम्यान, राज्य शासन, टाटा ट्रस्ट, रिलायन्स फाउंडेशन, ऍक्सिस बँक फाउंडेशन आणि बायएफ’च्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन राबवून यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ३६ ग्रामपंचायतीच्या ७२ गावांमध्ये स्वतःच्या प्रशासकीय कुशलतेतून विकासाचं उत्तम उदाहरण निर्माण केलं. टाटा ट्रस्टने यवतमाळ आणि नेर तालुक्यात मत्स्यपालन, सौरऊर्जेवरील अंगणवाडी तसेच डिजिटल शाळा निर्मितीच्या कामांना बळ दिले. विशेष म्हणजे इथे पिण्याचे पाणी, किचन गार्डन आणि शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. बायफ’ने ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे, तसेच व्यवसाय कसा करावा आणि त्या संबंधित प्रस्ताव कसा बनवायचा याचे ग्रामस्थांना मागदर्शन केलं आणि त्यांच्यातला उद्योजक जागृत करण्यावर भर दिला.
इतकंच नव्हे तर लोकशाही आणि सामान्य जनता हेच आपल्या देशाचा मूळ गाभा असल्याने निवडणूक प्रक्रियेतील संभ्रम लोकांच्या मनातून दूर करण्यासाठी गावोगावी आधुनिक ईव्हीएम मशिन्स मागवल्या आणि लोकांना त्याविषयी मार्गदर्शन करून मोठ्याप्रमाणावर जनजागृती सुद्धा केली. प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्याच्या विकासाची माहिती करून घेतली तेव्हा जिल्ह्याला मिळालेल्या बहुमानाचे श्रेय म्हणजे ग्रामस्थांच्या श्रमाचे फलित असल्याचे सांगितले आणि त्यातून त्यांच्यातला जिल्हाधिकारी नव्हे, तर स्वतःच्या टीम’ला सोबत घेऊन ‘टीमवर्क’ने स्वप्न सत्यात उतरवणारा कुशल ‘प्रशासकीय लीडर’ समोर आला. कारण कोणत्याही गावात कोणतीही योजना ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय सत्यात उतरूच शकत नाहीत, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
असे कर्तव्यदक्ष व उत्तम प्रशासक तसेच लोकाभिमुख सेवा करणारे यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख [IAS- जिल्हाधिकारी यवतमाळ] यांची ह्या वर्षीच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर – २०१९’ पुरस्कारासाठी प्रशासन आय.ए.एस या प्राॅमिसिंग या कॅटेगरी मध्ये नामांकन झाले आहे. दरम्यान, प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांना सामान्यांकडून सुद्धा प्रोत्साहन मिळाले गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. राजेश देशमुख यांना या लिंक वर Click करून त्यांना ऑनलाईन मतदान करा आणि लोकशाही अजून सुदृढ करा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN