नवी दिल्ली : प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात उतरताच त्याचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या पाठीमागे ईडी’चा ससेमिरा लागल्याचे विरोधक आरोप करत आहेत. दरम्यान आज मनी लाँड्रिंगप्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांदी यांचे पती रॉबर्ट वाड्रा ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडीकडून त्यांची तब्बल ५ तास सखोल चौकशी झाल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, वाड्रा यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांवर दिलेली उत्तर समाधानकारक नसल्याचे ईडीने यावेळी सांगितले. दरम्यान, लंडनच्या ब्रायनस्टन स्क्वेयर परिसरातील १७.६१ कोटी रुपयांची जमीन वाड्रा यांनी पैशांची अफरातफर करुन खरेदी केलाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. परंतु रॉबर्ट वाड्रा यांनी आपली लंडनमध्ये कोणती सुद्धा संपत्ती नसल्याचा दावा केला, अशी माहिती मिळत आहे. वाड्रा यांना सदर प्रकरणी दिल्ली कोर्टाने १६ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे आणि चौकशी दरम्यान संपूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
