
Investment Tips | पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत, ज्या खूप गुंतवणुकीसाठी आणि जबरदस्त परतावा देण्यासाठी लोकप्रिय आहेत. जर तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर पैसे बुडण्याची कोणतीही जोखीम नाही. लाखो लोक पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनांमध्ये पैसे लावतात. इंडिया पोस्ट ऑफिस तर्फे ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या. यापैकी एक योजना म्हणजेच “ग्राम सुरक्षा” योजना. या योजनेत तुम्ही दररोज किमान 50 रुपये गुंतवू शकता आणि दीर्घकाळ पैसे जमा करून 38 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळवू शकता.
ग्राम सुरक्षा योजना : 35 लाखांचा लाभ
या लेखात आपण ग्राम सुरक्षा योजना बद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला 35 लाखांचा जबरदस्त लाभ मिळवता येऊ शकतो. गुंतवणूकदारांना या योजनेची रक्कम 80 व्या वर्षी बोनससह परत मिळेल. गुंतवणूक केलेल्या व्यक्तीचे वयाच्या 80 वर्षापूर्वी निधन झाल्यास, त्या व्यक्तीच्या नॉमिनीला ही सर्व रक्कम व्याजासह परत मिळते. या योजनेत 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक सुरू करू शकते. या योजनेत किमान 10 हजार ते 10 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करता येते. तुम्ही त्याचा हप्ता 1, 3, 6 किंवा वार्षिक आधारावर भरू शकता.
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यां लोकांना चार वर्षांनंतर कर्जाची सुविधाही दिली जाते. जर पॉलिसीधारकाला योजनेतील गुंतवणुक सरेंडर किवा रद्द करायची असेल, तर पॉलिसी सुरू केल्यानंतर 3 वर्षांनी ती सरेंडर करता येते. या योजनेतील बोनसबद्दल सांगायचे तर, या योजनेच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांनी बोनस दिला जातो.
दर महिन्याला 1500 रुपये :
जर समजा तुम्ही पात्र व्यक्ती असून दर महिन्याला या योजनेत 1500 रुपये जमा करत असाल तर, म्हणजेच दररोज फक्त 50 रुपये गुंतवत असाल, तर या योजनेच्या मॅच्युरिटीवर, तुम्हाला तब्बल 35 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.